आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, March 24, 2008

मिस्टर अँड मिसेस बबन

मिस्टर अँड मिसेस बबन,
हे एक जोडपं भन्नाट होतं...
तिचं वजन सत्तरच्या वर,
तर त्याचं फक्त पन्नास होतं!

ती होती मस्त गुळाची ढेप,
बबन नुसताच काटकुळा ऊस...
मिस्कीलपणे त्यांच्या जोडीला,
लोकं म्हणती "उंदीर आणि घूस"!

एकदा तिने बबनला विचारलं,
माझी वाटते का रे तुला लाज?
हसून बबन म्हणाला तिला,
परत बोलू नको, बोललीस जे आज!

बारीक वा जाडी तू माझी आहेस,
तुझ्याशीच गुंफला प्रेमाचा धागा आहे...
कितीही आकार वाढला तुझा तरीही,
हृदयात मावशील एवढी जागा आहे!

उत्तर ऐकून ती फार सुखवली,
आनंदाने तिची हास्यलाली फुलली...
तुम्हाला वरलं हे माझं सौभाग्यचं आहे,
पुन्हा पुन्हा ती हे प्रेमाने बोलली!

मित्रांनो तुमच्यातही एक बबन आहे,
कदाचित झोपला असेल, त्याला जागवा...
आणि बायको कित्तीही वाढली तरीही,
बबनप्रमाणेच तिला प्रेमाने वागवा!
बबनप्रमाणेच तिला प्रेमाने वागवा!!

कवी: चंद्रजीत

माणसे नेहमी अशी का वागतात ????

माणसे नेहमी अशी का वागतात,
काही न जानता दुसरयाला दोषी का ठरवतात......

आपण बोललेले ते पापच का असते,
अन् दुसरयाने बोललेले ते माफच का असते.......

त्यांनी काहीही बोलले तरी ती मस्करीच असते,
आणि आपण काही बोलले तरी ते शापच असते.......

आपण नेहमी त्यांच्या सुखासाठी लढतो,
आणि ते मात्र नेहमी आपल्याला दुखानेच हरवतात.........

आपल्या डोळ्यात जरी त्यांच्यासाठी अश्रु असले,
तरी त्यांच्यासाठी ते फक्त पाणीच असते..........

असो आपण मात्र नेहमी त्यांच्यासाठी चांगलेच वागावे,
जरी त्यांनी विष दिले तरी ते आपण अमृत समजूनच घ्यावे.........

तरीही शेवटी हा प्रश्न उरतोच की........
माणसे नेहमी अशी का वागतात????

शब्द, कल्पना - अभिजीत महाडीक
आम्ही प्रेम करणारच, चोचीत चोच पडणारच
काहीही म्हणूदेत दुनिया सारी, आम्ही नव्याने लढणारच

लैला-मजनू, हीर-रांझा नव्या नव्याने पैदा होणार
कॉलेज कॅम्पस, चौपाटी, कट्टे सारे नव्या जोड्यांनी फुलणार
पुन्हा नव्याने येणार श्रावण, सारे नव्याने भिजणारच
गळ्यात गळे पडणारच, आम्ही प्रेम करणारच

झेड ब्रिज, दुर्गा टेकडी मिळेल तिकडे जात रहाणार
एकाच कपात चहा घोटणार, हातामध्ये हात पडणार
पोलीस मामा आलाच भिडायला, त्यालासुध्दा भिडणारच
ह्या वयात भुलणारच, आम्ही प्रेम करणारच

बाईकमागे खेटुन बसता, आमचा तोल सुटत जाणार
चौक असो, सिग्नल असो.. सारं काही तुटत जाणार
खड्डे येवोत, नको येवोत, मध्येच ब्रेक लागणारच
रुसवे-फुगवे घडणारच, आम्ही प्रेम करणारच

काहीही म्हणूदेत दुनिया सारी, आम्ही नव्याने लढणारच
चोचीत चोच पडणारच, आम्ही प्रेम करणारच

कवी: संतोष (कवितेतला)