आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, February 18, 2008

आसवांच्या पावसाला हाक देतो
आठवांच्या पाखराला हाक देतो

गायली तू माझिया गझलेस जेथे
मी पुन्हा त्या मैफलीला हाक देतो

काय होते सांग नाते आपले ते?
कोण माझे मी कुणाला हाक देतो?

गाव माझा दूर ना, मी दूर आहे
थांबलेल्या पावलाला हाक देतो

रात होता, मी गर्द काळोख होतो
एकटा मी हुंदक्याला हाक देतो

वाटते की आवरावा हा पसारा
संपताना संपण्याला हाक देतो?

शब्द - संदीप सुरळे

एकदा एका झुरळाला
असह्य झाले झुरळपण
त्याने फुलपाखरू होण्याचा
मनामधे केला पण

विविध रंगांनी आपले
पंख त्याने रंगवले
फुलांवर दिमाखात
तेही मिरवू लागले

फुलपाखरामध्ये फिरला
पाहिल्या विविध छटा
पण थोड्याच वेळात
झाला एकटा एकटा

त्याला समजणारे
तिथे कोणीच नव्हते
फुलपाखरांचे सगले
संदर्भ वेगले होते

ओशाळला बिचारा
परत फिरला माघारी
मित्रांनी केली होती
स्वागताची तैयारी

बगिचा रिटर्न झुरळ
म्हणून मित्रांचे स्वागत
ग्रहण करत बिलगला
सगळ्यांना धावत धावत

मनापासून म्हनाला
मित्रांनो मी चुकलो
आपल्याच वेडात ख-या
झुरळपणाला मुकलो

आता एक चांगले
झुरळ व्हायचे ठरवलेय
स्वतःच्या अस्तित्वाला
आता मी ओळखलय

तुषार जोशी, नागपूर
माझ्या मनाला मी सांगु कीती?
हा सावल्यांचाच छंद आहे....
तु असा अंतरी का सैरावतो?
हा कातराचाच बंध आहे....

किरणे स्वरांची रंगात न्हाली
कैसी ही तळमळ हृदयात झाली
तिचा भास अजुनी ओलाच कैसा?
हा आसवांचाच रंग आहे....

कळी चांदण्यांची करती ईशारे
मार्गात काटे फ़ुलविती पिसारे
तुझा चांद ऎसा का धुंदावलेला?
हा चांदण्यांचाच गंध आहे....

सरी आठवांच्या बरसुन गेल्या
पापण्या दिशांच्या ओलावलेल्या
कैसे या क्षीतीजाने सावरावे?
आवाज सरींचाच मंद आहे....

--सचिन काकडे[फ़ेबृवारी १५,२००७]
फ़क्त तुझ्यासाठीच "हा खेळ सावल्यांचा"