आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, September 05, 2007

चुकुन तिच्या
प्रेमात पडलो
जीवनातले सुख
गमावुन बसलो

तिच्या अदांनी
मन घायाळ झाले
ह्रदयातचे घड्याळ
जोऱ्यात वाजू लागले

रात्रीची झोप
उडून गेली
दिवसा उजेडी
स्वप्न पडू लागली

प्रत्येक ठिकाणी
तिचा भास होउ लागला
तिच्या आठवणीने
जीव व्याकुळ झाला

एका बेसावध क्षणी
तिला विचारून टाकले
शब्दातून ह्रदय
मांडुन टाकले

न बोलताच
तिने नकार दिला
मैत्री तरी ठेव म्हणत
मी ही प्रतिकार केला

प्रेमात तिच्या
अजुनही झुरतो
तिच्या मैत्रीलाही
तरसतो आहे

नाव तिचे घेण्यात
वेगळीच नशा आहे
कधीतरी हो म्हणेल अशी
वेडी आशा आहे

कवी: अद्न्यात
योगदान : रेशमा

Tuesday, September 04, 2007

नशीबाच्या हातून हल्ली ठगत नाही

हल्ली मी मलाच शोधत नाही
कुठेच थांगपत्ता लागत नाही

पायांनी किती अंतर कापले
हातांच्या फेऱ्या वरून मोजत नाही

निवडुंग कुठेही जगतो म्हणून
तुळशी शेजारी कुणी लावत नाही

विदूषकाच्या देहात शिरताना हल्ली
दु:खांना सुखाने भागत नाही

तारा तुटताच नुसताच पाहतो
नशीबाच्या हातून हल्ली ठगत नाही

चालाख, जुगारी हातांशी हल्ली
हवा तसा पत्ता वागत नाही

फळ्यावर ब्रम्हज्ञान लिहीलं जरी
फळ्याच्या ज्ञानात भर पडत नाही

@सनिल पांगे
शाळेची आठवण...

आठवतात ते दिवस,
वर्गात जाण्यासाठि धावायचो,
पहिला बॆंच पकडण्यासाठि,
अनेकदा धडपडायचो.

आठवते मला दप्तरातली,
पेन्सिल आणि दुहेरी रेघांची वही,
घ्यायला लागायची ग्रुहपाठावर,
नियमित आई बाबांची सहि.

रोज सकाळि प्रार्थनेला,
वेळेवर हजर राहणे,
मधल्या सुट्टित डबा खाऊन,
धावत मैदानावर जाणे.

हस्तकलेच्या तासाला,
काहितरी उपद्व्याप करणे,
अन वर्गासमोर शिक्षकांचा,
पाठित धपाटा खाणे.

खेळाच्या तासाला जाताना,
एका रांगेतुन चालणे,
अन परत येत असताना,
मित्रांच्या खोड्या काढणे.

सहामाहि परिक्षेनंतर येणा-या
दिवाळिच्या सुट्टिची मजा
आणि त्या सुट्टित बाईंनी दिलेल्या
दिवाळिच्या अभ्यासाची सजा.

वार्षिक परिक्षेच्या वेळि,
येणा-या उन्हाळि सुट्टिची तयारी,
अन निकाल लागल्यानंतर,
बाहेर पडायची आमची हुशारी.

परत नवीन वर्गात जाण्यासाठि,
मनं उत्साहि व्हायचं,
अन पहिला बॆंच पकडण्यासाठि,
पुन: पुन: धडपडायचं......

कवी : अद्न्यात