आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, November 13, 2008

स्वतःवर प्रेम करणं


एकदा का ही ताकद ओळखली, की आपण स्वतःवरच नव्हे, तर सगळ्यांवरच प्रेम करू लागतो. …….
तुम्ही स्वतःच्या कधी प्रेमात पडला आहात? स्वतःच स्वतःला खूप आवडला आहात? विचित्र वाटतोय प्रश्‍न, की असा कधी विचारच आला नाही मनात?

हा काही आध्यात्मिक प्रश्‍न नाहीए. साधा सरळ विचार आहे. आपण आपल्याला आवडणे यासारखी सुंदर गोष्ट नाही. आपण नेहमीच इतरांशी असलेल्या आपल्या नात्यांविषयी बोलत असतो, पण आपलं आपल्याशीही काही नातं असतं, याचा अनेकदा विचारच करत नाही. आपण आपल्यालाच काही देणं असतो. आपलं आपल्याशीच काही मागणं असतं. कधी मनाच्या या आवाजाचा विचार केला आहे? इथे आतला आवाज (सोनिया गांधी आठवल्या असतील) म्हणजे आपली विवेकबुद्धी अपेक्षित नाही. तो तर मनाचा एक वेगळाच कप्पा आहे… आपल्याला अंतर्बाह्य सच्चा ठेवणारा. हा आवाज आहे आपल्याला आनंददायी जगणं शिकवणारा. आपल्याला आपल्यावरच प्रेम करायला शिकवणारा. कारण एकदा का तुम्ही स्वतःच्या प्रेमात पडलात, की जगणंही सुंदर होऊन जातं.

स्वतःच्या प्रेमात पडणं म्हणजे आत्मकेंद्री, स्वार्थी प्रेम नव्हे, तर ते आहे आपल्यातली अमर्याद प्रेम करण्याची ताकद ओळखणं. एकदा का ही ताकद ओळखली, की आपण स्वतःवरच नव्हे, तर सगळ्यांवरच प्रेम करू लागतो. कारण आपल्याला जग होकारार्थी भासू लागतं. जगातली प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी आहे तशी घडू लागते. कामात आपण जादा ऍक्‍टिव्ह होतो. मग त्याच्याशी जे जे संबंधित असतात ते खूष. समोरचे खूष की आपण खूष. विन विन सिच्युएशन!

म्हणूनच म्हटलं, तुम्ही कधी स्वतःच्या प्रेमात पडला आहात? नसलं तर पडून बघा. हे प्रेम म्हणजे काय, तर आपण आपल्यावर खूष असणं. तुम्ही कधी तुम्हा स्वतःला गिफ्ट दिलं आहे? म्हणजे कपडे, बॅगा, इतर गरजेच्या वस्तू या आपण गरजेच्या वस्तू म्हणून घेत असतो किंवा आवडलं म्हणून घेत असतो. (पैसे आहेत ते कुठे संपवायचे, म्हणूनही अनेक जण घेत असतील) पण एखादी ठरवलेली गोष्ट केली, किंवा बराच काळ रेंगाळलेलं, रखडलेलं काम पुढाकार घेऊन पूर्ण केलं म्हणून खूष होऊन स्वतःला बक्षीस देऊ केलंय? देऊन बघा. इथं फक्त एखादी वस्तू स्वतःला प्रेझेंट करण्यापर्यंत, किंवा आवडती खायची वस्तू घेण्यापुरतंच हे मर्यादित नाही. तर मनाला आवडेल ती गोष्ट करायची. कोणाला जर संपूर्ण दिवस लोळत काढायचा असेल तर यथेच्छ काढावा (इथं स्वतःचं घर हवं किंवा घरातल्यांना ही गोष्ट पटवून द्यायला हवी. सॉरी!) पण उलटंही आहे बरं! एखादी गोष्ट नाही घडली मनासारखी तर खूप वेदना होतात. अशा वेळी लोकांच्या भिडेस्तव दुःख मनाशी दाबून टाकतो. नकोच करायला असं. मनाचं ऐकायचं, मनसोक्त रडून घ्यायचं. मन स्वच्छ होऊन जाईल. मोकळं मोकळं!

आयटीच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना "तरुणांचा" लेखक चेतन भगत यानेही याचाच वेगळ्या शब्दांत उल्लेख केला आहे. त्याने या भावनेला तुमच्यातला स्पार्क जिवंत ठेवणं, असं म्हटलं आहे. हा स्पार्क जिवंत असला की तुम्ही भरभरून जगू शकता. एकदा का तो स्पार्क धूसर झाला, की जगणं साचलेलं डबकं होऊन जातं. म्हणूनच हा स्पार्क कायम ठेवण्यासाठी त्याने अपेक्षाभंग, नैराश्‍य आणि एकटेपणा या बाबी आयुष्यातून काढून टाकायला हव्यात, असं सांगितलं आहे. यात एक उदाहरण देताना त्यानं लिहिलंय, "मी नाही ऐश्‍वर्या रायसारखा सुंदर, पण म्हणून काय झालं! माझी दोन मुलं तिच्यापेक्षा सुंदर आहेत!' चेतनचा हा दृष्टिकोन, आणि अर्थातच त्यामागची भावना म्हणजेच स्वतःवर प्रेम करणं

No comments: