प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी मन धावत होतं। हे मनाचं प्रकरण छान आहे. जागा न सोडता ते हजारो मैल भटकतं आणि सगळ्यांना भेटतं. पण शरीर त्यापैकी एक दोन ठिकाणीच जाऊ शकतं.
अत्यंत महागडी, न परवडणारी खर्या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य".
नजर आणि स्पर्श, प्रेमाची ही भावना इतकी सर्व श्रेष्ट भावना आहे की नुसते शब्द कमी पडणार आहेत, हे जाणूनच निसर्गानं स्पर्श निर्माण केला. म्हणूनच प्रेमाची सांगता स्पर्शाशिवाय होत नाही.'
समाज तप्त सुर्यासारखा असतो. आगीचा कितीही वर्षाव झाला तरीही ती सूर्यफ़ुलं सूर्याकडेच पाहत राहतात. तोंड फ़िरवीत नाहीत. माझ्यासारख्या निराधार बाईकडे समाज असाच बघत असतो. सूर्यासारखा रोखून. अशा समाजाला तोंड देतानाही टवटवीत रहायचं हे मला सूर्यफ़ुलांनी शिकवलं.----
-----व. पु. काळे
No comments:
Post a Comment