आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, December 11, 2007

पहाटवारा मला माझी म्हणतो
अंतरीचे गूज प्रेमाने सांगतो

दव भरली पाती मला खुणावतात
माझ्याकडे बघून निर्व्याज हसतात

पाण्यात नाचणारी चिमणी घेते गिरकी
हसते मिष्कील घेते फिरकी

संथ वाहणारा गंभीर ढग,गरजतो
आणि अलवार,अलगद सर्वांगावर बरसतो

चिंब भिजलेली फुलं आणखी गहिरी होतात
ये ना,आमच्यात भिजायला..कल्ला करतात

पाणी निपटत, निथळत माड भेटतात
तू आमचीच आहेस असं सांगायला आणखी वाकतात

प्राजक्त आसुसलेला , मला भेटायला
मी दिसतात लक्ष फुलांची पखरण करायला

माणसांचचं असं का होतं कळतं नाही,
आप-पराचा गुंता का होतो, जो सुटत नाही ?

कवयित्री- नेहा आठवले

No comments: