आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, November 13, 2007

मौन आता सखे मी पाळतो....

मौन आता सखे मी पाळतो....

मौन आता सखे मी पाळतो....
भावना मनाच्या मी जाळतो....

तू येणार नसतेस तरीही,
तुझी वाट पाहूनी कंटाळतो....

ठरवले तुला मी विसरायचे,
तुझ्या आठवांशी रेंगाळतो....

घाव ह्रदयाचा दाबून मी,
वेदना उराशी सांभाळतो....

होते वृष्टी अशी नयनांतूनी,
पुन्हा भिजूनी, पुन्हा वाळतो....

मनाच्या व्यथेची मला काळजी,
म्हणुनी तुला पाहणे टाळतो....

भोगतो कशाला अशा यातना,
नशीबाच्या रेखा मी चाळतो....

मौन आता सखे मी पाळतो....
भावना मनाच्या मी जाळतो....

कवी: निरज कुलकर्णी

No comments: