आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, November 28, 2007

या विशाल अवनि वरति,
प्रशांत सागर वसतो
त्यास भेटण्या सरीता का
धावते जणु अभीसारीका?

त्या लाल कमल पुष्पात
गोड मकरंदाची रेलचेल
आत भ्रमर कैद होतो
रात्री तिथेच का रमतो?

गगनात चंद्रमा हसतो
धवल प्रकाश पसरतो
ते मनोहर द्रुश्य बघुनि
का सागर उफाळतो?

ति फुले रंगी बेरंगी
माद्क रस गंधाने फुलति.
त्या रान पुष्पा वरति..
का भ्र्मर असा घुटमळतो?

त्याच्याच नाभी कमलात
कस्तुरी गंध दरवळतो
तरीहि तो कस्तुरी मृग
का शोध घेत फिरतो?

असे कितिक गोड प्रश्ण
का सतावतात मजला?
या शंकांचे समाधान
कधी होइल का मजला??

अश्याच एका कातरवेळी
भेट्लास तु सजणा
तनुत विज कल्लोळली
स्पर्शाने काया मोहरली

घेतलेस मज मिठीत
चुंबलेस लाल अधरा
सा~या प्रश्णांची उत्तरे
दिलिस मज तु प्रियकरा

-- अविनाश कुलकर्णी
http://avinashkulkarni.blogspot.com

No comments: