दुःखांशी हितगुज करणे, ही सवयच मजला आहे
बहुतेक व्यथा गोंजरणे, ही सवयच मजला आहे
जन कितीक मज समजवती, हसूनी ते ऐकून घेणे
परी फक्त मनाचे करणे, ही सवयच मजला आहे
ही खुणवतात जरी मजला, कितीवार उद्याची स्वप्ने
भुतकाळाशी घुटमळणे, ही सवयच मजला आहे
पूष्पांच्या सौंदर्याचे, सारेच दिवाणे परंतू
काट्यांशी सलगी करणे, ही सवयच मजला आहे
जग भुलते ह्या चेहे-याला, जो सदैव हास्यच ल्यातो
एकटेच मग गहिवरणे, ही सवयच मजला आहे
भरूनी आलेल्या जखमा, विसरून गेलेली दुःखे
सा-यांना गोळा करणे, ही सवयच मजला आहे
असतील कितीकही घुसले, खंजिर जरी पाठीत
शत्रूस उराशी धरणे, ही सवयच मजला आहे
त्यांनी संपवण्या मजला, केले किती घाव परंतु
सर्वांना पुरूनी उरणे, ही सवयच मजला आहे
आशिष्
बहुतेक व्यथा गोंजरणे, ही सवयच मजला आहे
जन कितीक मज समजवती, हसूनी ते ऐकून घेणे
परी फक्त मनाचे करणे, ही सवयच मजला आहे
ही खुणवतात जरी मजला, कितीवार उद्याची स्वप्ने
भुतकाळाशी घुटमळणे, ही सवयच मजला आहे
पूष्पांच्या सौंदर्याचे, सारेच दिवाणे परंतू
काट्यांशी सलगी करणे, ही सवयच मजला आहे
जग भुलते ह्या चेहे-याला, जो सदैव हास्यच ल्यातो
एकटेच मग गहिवरणे, ही सवयच मजला आहे
भरूनी आलेल्या जखमा, विसरून गेलेली दुःखे
सा-यांना गोळा करणे, ही सवयच मजला आहे
असतील कितीकही घुसले, खंजिर जरी पाठीत
शत्रूस उराशी धरणे, ही सवयच मजला आहे
त्यांनी संपवण्या मजला, केले किती घाव परंतु
सर्वांना पुरूनी उरणे, ही सवयच मजला आहे
आशिष्
No comments:
Post a Comment