आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, October 10, 2007

कुंतलांच्या दाट छायेत विसावण्याची, संवय ती लावून गेली
आठवणींच्या तुषारांत चिंब होण्याची, चटक ती लावून गेली...

भुरभुरती अलक मऊ रेशमी, कधी गुलाबी गालांवरती
मंद मंद सुगंधे गंधित होण्याचा, नाद ती लावून गेली ....

ओंठ गुलाबी पाकळी, बागेतील कळी कळीचा रस शोषलेली
अधर मधुकलश, तयांची मनी, हुरहूर ती लावून गेली ....

झर झर जसा वाहे निर्झर, हास्य तिचे खळ खळ अवखळ
रमणीच्या हास्यात पुनः रमण्याची, चुटपूट ती लावून गेली....

लाजरे हसरे काळे टपोर डोळे, बोलत असत रात्रंदिनी
झोप उडवूनि, मज त्या सुनयनांची, चटक ती लावून गेली..

कवी: अरविंद चौधरी

No comments: