आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, October 12, 2007

तुझा विचार करताना
मी कधी घड्याळ बघत नाही,
कारण काटे फीरताना दिसतात...
पण वेळेच भानच उरत नाही......

तुझा विचार करताना
मी कधी मुकि रडत नाही,
कारण आसवांतही तुच दिसतोस...
अन मग डोळ्यात आसुच उरत नाही......

तुझा विचार करताना
मी कधी हलके लाजत नाही,
कारण गालावर लाली चढते...
अन मग माझच सुख मला सोसत नाही......

तुझा विचार करताना
मी कधी तुझी वाट बघत नाही,
कारण सगळीकडे तुच असतोस...
क्षितिजापर्यंत जाणारा दुसरा रस्ताच दिसत नाही......

तुझा विचार करताना
मी कधी हरत नाही,
कारन तुझा विचार केल्यावर...
मी माझिच मुळी उरत नाही

कवी: ...........

No comments: