आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, October 03, 2007

रंग संगतीत तुझ्या शब्दसुरांची
उधळण ताला सूरात केली..
माझी या शब्दसुरांची माळ
तुझ्या कंठाभोवती ओवली...
सखे आज मी तुझ्यावरच कवीता लिहली..

तु सजवतेच मैफिल आनंदाची,
जेव्हा बिकट परिस्थिती माझ्या मनाची..
मग माझ्या ह्रिदयात उफाळून येते
उकळी त्या प्रीत गझलेच्या दुधाची...

कातरवेळीच्या त्या आठवणीची
झळ माझ्या काहूर माजत असते..
अन तु आपली माझ्याकडे येण्यासाठी
शुभ्र वस्त्र मर्मपरीचे नेसत असते..

मग चांदण्याची रात्र नवेली येते..
अन चंदेरी स्वप्नांची बरसात होते..
का अशी तू नेहमी उन सावलीच्या खेळात..
मला हरवून स्वत: हरल्याचा आभास देऊनी जाते..

कधी चिंब भिजवणारा ओला पाऊस ,
माझ्या मिठीत अनुभवतेस तर
कधी गुलाबी थंडीची ती
कामूक पहाट आणखी गुलाबी करतेस..

अशक्य आहे त्यावर तु तुझी किमया करतेस,
माझ्य प्रत्येक काट्यांच्या वाटेवर फुले उधळतेस..
का नेहमीच तु तुझ्या आकांक्षेला वेशीला टांगून
नेहमी माझ्या इच्छा आतुरतेने पुर्ण करतेस..

सखे मी पापांचा धनी,
अन तू निर्मळ हंसीनी..
किती फरक जमीन आसमानचा आपुल्यामधे..
तरीही तु लाजून म्हणतेस, "तुम्ही तर मालक माझे सरळ नी साधे"

काय म्हणाव या निस्वार्थ प्रेमाला,
का जोडावेत हाथ तुझ्याशिवाय त्या देवाला..
बस अशीच देवाच देवपण जपत माझ्याजवळ रहा..
अन या वाल्या कोळ्याला वाल्मिकी बनवत रहा...

---- आ.. आदित्य....

No comments: