आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, October 01, 2007

तुझ्यासाठी मी रात्र रात्र जागणं
पण तुझ्या अश्या वागण्याने हा
रात्रीचा काळ आज मा़झ्यावर हसला
तुलाच जमलं नाही माझ्यासोबत जगणं
मग सखे आज असा तुझा हा
आळ माझ्या शब्दांवर कसला

तु जेव्हा-जेव्हा रागावलीस
तेव्हा तुझ्या हृदयाचा झोका
मी एकट्यानेच हजारदा ओढलाय
पण तुला समजवायला निघालो की
तुझा हट्टी तो स्वभाव नेहमीच
रस्त्यात मला बघ नडलाय

सांग ना सखे असा कसा
गं तुझा हट्टी स्वभाव
ना त्यात कुठला भाव,
ना त्यास कुठला गाव

खरचं वैतागलोय आता
तुला सारखं-सारखं समजाऊन
मनं माझं म्हणतय
"आता तु ही पाह रे
जरासा तिच्यावर रागावुन" ?

एक सांगु सखे , माझं वेळ साक्षी आहे
आजवर माझ्यावर बोट उचलणारा हात
दरवेळी स्वतःहुनच मोडलाय

माझ्या मनाच्या सांगण्यावरुनच तुला समजवणारा प्रत्येक शब्द
आता मी काळजावरुन खोडलाय
पण आता जे होईल ते होईलआता आपल्या नात्याचा निकाल
मी तु़झ्या उत्तरावर सोडलाय......

भासतं मला आज जणु हा सांजगारवा मनात
माझ्या "फक्त तुझ्यासाठीच" दडलाय
वाटतं मला सखे आज
की जीव माझा तुझ्यावर जडलाय....
हा जीव वेडा तुझ्यावर जडलाय....

--फ़क्त तुझ्यासाठीच "हा खेळ सावल्यांचा"
--सचिन काकडे

No comments: