आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, September 05, 2007

तु म्हणजे एक स्वप्न

तु म्हणजे एक स्वप्न...,
भल्या पहाटे पडणारे,
तरीही खोटे ठरणारे........ ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
मनात दडुन ठेवलेले,
कितीही भासविले तरीही, डोळ्यातुन ओघळारे ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
श्वासाश्वासात भिनलेले,
तरिही दुर दुर असणारे...

तु म्हणजे एक स्वप्न...,
तुझ्या आठवणीत जगणारे,
मित्र जवळ असुनही, तुलाच शोधत फ़िरणारे

तु म्हणजे एक स्वप्न...,
दिवसा सुद्धा छळणारे,
ती सोबत नसतानाही, असल्याचे भासविणारे

तु म्हणजे एक स्वप्न...,
आठवणींचा कोंदवाडा करणारे,
अनेकदा सावरले तरीही, पुन्हा सर्व पसरणारे

तु म्हणजे एक स्वप्न...,
माझे कधिही न झालेले,
तु दुर असलीस तरीही, तुझ्या सुखासाठी तळमळणारे

तु म्हणजे एक स्वप्न...,
तुझ्या विरहात एकटेच जगणारे,
तु जिंकावीस म्हणुन, कितेकदा स्वत:लाच हरविणारे

तु म्हणजे एक स्वप्न...,
येण्याची तुझ्या, त्याच वळणावर वाट पाहणारे,
प्रत्येक वसंतात झडुनही, पालवीची आस धरणारे

तु म्हणजे एक स्वप्न...,
शब्दा शब्दात विणलेले,
मला मात्र नव्या कवितेला वाव देणारे


कवी : अद्न्यात
योगदान : रेशमा


1 comment:

Anonymous said...

तू म्हणजे एक स्वपन.. ही माझी पहीली कवीता आहे.. आपण येथे पोस्ट केलीत त्याबद्दल आपले आभार..

पण ह्या कवीतेत थोडे बदल आहेत.. ते आपण माझ्या ब्लोगवर बघू शकतात.

mandarhingne.blogspot.com