आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, September 03, 2007

पाहील मी पहील्यादांच
तिचं गोड हसणं, तिझं ते रुप देखणं
मनाने हाक देताच नेमकं
तिने मागे वळुन पाहणं
त्या पहील्या भेटीत मित्रहो
मी तिचा दिवाना झालो होतो

त्यादिवसानंतर मी कितींदा
अख्खी रात्र जागवली , दिवसा तिची स्वप्न पाहीली
न राहुन एकदा तिला मी तिची मर्जी विचारली
शब्द माझे कानी पडताच ति छान लाजली
तिच्या मनाच्या घरट्यात तेव्हा मित्रहो
त्या दिवशी मी नवा पाहुणा झालो होतो

या दुनियेला हरवाण्याची ईछचा
तिच्या मनी होती
त्यासाठी ती मला मदतीचा हात मागत होती
ध्येयाकडे पोहोचायला उत्साही साथ मागत होती
"फ़क्त तुझ्यासाठीच" म्हणत तेव्हा मित्रहो
मी तिच्या जिंकण्याचा बहाणा झालो होतो

दिला शब्द पाळत मी तिला शिकवलं
नजरेचा तीर चालवणं
शिकताना नेहमी तीनं
माझ्या नजरेत खोलवर पाहणं
अनं तिच्या त्या कातील
नजरेचा मित्रहो
शेवटी मीच निशाना झालो होतो

मनात तिच्या एकदा
स्वार्थाची ठीणगी ऊडाली
नियतीच्या खेळात तेव्हा
मला दगेबाजांची जात कळाली
तिच्या त्या अजब वागण्याने
माझी सारी स्वप्न धुळीस मिळाली
तिच्यासाठी मित्रहो तेव्हा
मी कदाचीत जुना-जमाना झालो होतो

सचिन काकडे [ सप्टेंबर १, २००७]

No comments: