आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, August 27, 2007

कसं सांगू तुला, काय वाटतं मला?
तुला तरी कळतंय का, काय झालंय मला?
माझंच मन मला विचारतंय, माझं बरोबर आहे का चुकतंय?
माझं मलाच कळत नाही, तुला तरी कशी सांगणार वेड्या?
पुढचा शब्द आठवतांना मागचा विसरत गेला
शब्दाशी शब्द जुळवतांना सगळा वेळ गेला
शब्दापेक्षा स्पर्शातून कळेल सगळं तुला
शब्दांच्या पलिकडचं काही ...........
शब्दांच्या बुडबुडयात पकडायचं नाही मला
शब्द फक्त प्रतिक आहे, भावनांचं ब्रम्ह आहे
अंतरात्मा जुळ्ल्यावर गरज काय सांगायची?
असंच वाटतं मला !!!!!!!!!!!!!!
मी तुझी अन तू माझा.............
एवढीच शिदोरी पुरेल आयुष्याच्या प्रवासाला
पण तरीही....................
हळवं मन व्याकुळ होतं खूप रडावंसं वाटतं
कितीही सावरलं तरी डोळ्यातलं पाणी वाहात राहतं
आणि विचारतं -- काय झालंय तुला? काय झालंय तुला??

-- विधि शिरोडकर

No comments: