आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, August 30, 2007

सखे आज या गुलाबी पहाटेला..
मला कशी काय जाग आली..
जणु माझ्या झोपेलाही..
तुझ्या भेटीची चाहूल लागली...

सारं काही नवीन घडतयं..
भावनेचं बीज अल्हाद अंकूरतयं..
अस भासत होतं अन उगाच
कुठेतरी स्वप्नील जग अस्तित्वात अवतरत होतं...

तुझ्या मनाची ती घाई.. अन काळजाची धकधक
माझ्या पावलांचा वेग वाढवत होती..
हलक्याश्या एका किंतूच्या भितीने..
कपाळावर जमा झाले घामाचे मोती..

अखेर तू समोर दिसलीस अन
डोळे स्तब्ध खरोखर स्तब्ध झाले..
तुझ्या सौंदर्याचे ते नक्षत्र पाहूनी..
शब्द माझे ओठांवरच निमाले..

तुझ्या डोळ्यातली चमक पाहून
मलाही जरासं बरं वाटलं
माझ कृष्णवर्णीय रूपांन
तुझ्या मनात छोटूसं घरकूल थाटलं..

एरव्ही भेटायच भेटायचं म्हणून
हट्ट करणारी अचानक अबोलीच फुल झालीस तु..
पापण्या झूकवून माझ्या समोरी..
मंद गतीने येऊनी उभी राहीलीस तू..

तुझ्या हनूवटीला माझ्या तर्जनीचा आधार..
खरोखर लाजवूनी गेला...
माझ्या डोळ्यात डोळे घालून बघण्याचा
एक प्रेमाचा राज सांगूनी गेला..

तुझा माझ्यावरचा विश्वास ,
चेहर्‍यावरच्या आंनदात चमकूनी गेला..
अन आपल्या ह्या भेटीचा हा सुगंध..
त्या अलवार मिठीत दरवळूनी गेला..

खुप सारे विषय मांडण्याचे..
ते नियोजन कुठेच्या कुठे विरूनी गेले..
तुझ्या माझ्या ह्या प्रथम दर्शनात..
सारे काही गुलाबी रंगात रंगूनी गेले...

परत फिरण्याची वेळ आली अन
तुझ्या अश्रुधारानीं पायाभोवती साखळ्दंड ओवले..
तु म्हणालीस " आता नको जाऊस ,
तुझ्या विरहात मी खुप काही भोगले "..

तुला सावरत , स्वत:ला आवरत.
तुझ्या ओठांवरी अलगद स्पर्श देवूनी..
तुला वचन दिले , " पुन्हा पुन्हा परतोनी ,
तुझाच असेल, तुझ्या शिवाय मी माझा कधीच नसेल"...

तु हसलीस अन तयार झालीस
पुन्हा एकदा वाट बघायला..
डोळ्यात एक अस्तित्वाचे स्वप्न घेवूनी..
कायमच अन कायमच माझं व्हायला...


---- आ.. आदित्य...

No comments: