आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, July 20, 2007

आज खळखळ त्या पाण्याला तहान होती,
त्या आभाळाकडे ती जमीन गहा्ण होती,
कोण व्यक्त, कोण अव्यक्त,
पानांची सळसळ वणव्यापसून अजाण होती

सरींना 'पावित्र्य' टिकवण्याची लगबग होती,
नवीच पायवाट हरवण्यापासून घाबरत होती,
कोण ओथंबले, कोण तृष्णावले,
अवर्णनीय सुंदरता ती निसर्गाकडे आश्रित होती

आनंदल्या पावसाला अंगणाचीच मनाई होती,
काळ्या काळोखात ओली जाणीव सदृश्य होती,
म्हणे पाऊस, नको जाऊस,
आजच्या जाण्यास उद्याची साशंकता थांबवित होती

वाटचाल क्षणांची ती एका क्षणात बंदिस्त होती,
अंकुरलेली तृणाई वेंधळ्या नभाच्या स्वप्नांत होती,
कोण थांबले, कोण चालले,
दोघांच्या भेटीला गेल्या जन्मांची पुण्याई होती.........

No comments: