आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, July 16, 2007

परीसहल

परीराणी परीराणी लवकर ये
मला सुद्धा तुझ्यासंगे आकाशात ने
आकाशात जाऊन आपण सारे तारे तोडू,
ओंजळीत भरून तारे खूप खूप खेळू


परीराणी परीराणी लवकर ये
मला सुद्धा तुझ्यासंगे आकाशात ने
मऊ मऊ ढगांच्या गादीवर झोपू
चांदोबाकडे जाऊन त्याला गोड गोड साखरेचा पापा आपण देऊ

परीराणी परीराणी लवकर ये
मला सुद्धा तुझ्यासंगे आकाशात ने
खूप खूप खेळून आपण हाश हूश दमू
चॉकलेट आणि आइस्क्रीमच्या बागेकडे मोर्चा आपण नेऊ

परीराणी परीराणी लवकर ये
मला सुद्धा तुझ्यासंगे आकाशात ने
दोन दोन हातांनी मनसोक्त आइस्कीम चॉकलेट खाऊ
पोटोबा भरल्यावर वाऱ्या दादासोबत,
फुलांच्या रंगीत जगात आपण एक फेरफटका मारू

परीराणी परीराणी लवकर ये
मला सुद्धा तुझ्यासंगे आकाशात ने
खूप खूप तुझ्यासंगे गंमाडी जंम्मत करायची आहे मला
म्हणूनच लवकर लवकर ये स्वप्नात सांगते मी तुला.............

No comments: