आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Saturday, June 09, 2007

असा पाऊस बरसतो......
असा पाऊस बरसतो,
जसं तुझ्‍या प्रेमानं दाटून आलेलं आभाळ, सैर होऊन कोसळावं
अंगणातल्‍या मातीचा सुवास तुझ्‍या पाणीदार डोळ्‍्यांत हरवावा

ओन्‍जळभर पाण्‍यात, तुला स्‍मरावे सारे 'ते' पाऊस...
हिरवी ओली पाने अन् त्‍यांच्‍या टोकाशी नाचणारा हर एक थेंब!

माझ्‍या मनीचा विश्र्‍वास.....

मी वेडा...फ़क्‍त तुझ्‍याचसाठी
तुझे असणे किंवा नसणे याचं भानही नाही मला

ओन्‍जळभर पाऊस हातात माझ्‍या...त्‍यावरून फ़ुटणारे तुषार...
फ़क्‍त तुझेच!!!

तुझ्‍या प्रतिबिंबाला होणारा वार्‍याचा किंचित स्‍पर्श...
अन् मी घट्‍ट मिटून घेतलेली माझी मूठ!


आज ही 'तोच' पाऊस खुणावतोय...माझ्‍या मनातील तुझ्‍या प्रतिमेला!
मी मात्र घाबरलेला...बावरलेला
डोळे भरून ह्रदयात खोलवर साठवलेलं तुला,
ओन्‍जळभर पावसात पुन्‍हा उघड्‍या डोळ्‍यांनी भेटायचे....

पण...पण हा पाऊस, हा पाऊस...
जसा सर्वत्र,
तसाच...माझ्‍या डोळ्‍यात ही!

No comments: