वेळ थोडाच आहे गं माझ्याकडे
पण अजुनही खुप काही करायच बाकी आहे....
आपल्याच माणसान्नी दिलेल्या
जखमा भरायच अजुन बाकी आहे...
तुझ्या प्रेमाची सवय
झाली होती मला!
म्हणुनच तुला विसरायचा
प्रयत्न अजुन बाकी आहे....
तुझ्या अमुल्य वेळेतला थोडा
अजुन वेळ देशिल का मला?
अजुनही प्रेमाचं तुझ
एक कर्तव्य अजुन बाकी आहे....
मला स्मशानापर्यंत
सोडुनच परतु नकोस
माझ्या काळजात तुझ्याबद्द्ल्च्या
भावना अजुन बाकी आहेत......
जाताना त्या तुझ्यासन्गे घेउन जा...
कारण माझ्या देहाच
जळणं अजुन बाकी आहे......
मला जाळताना रडु नकोस वेडे
नाही तर त्या यमालाही सान्गाव लागेल
जरा थाम्बतोस का माझ
तिला समजवण अजुन बाकी आहे....
No comments:
Post a Comment