शब्द
शब्द एक वीज,शब्द एक तारा,
हाच शब्द कधीतरी,सुखावणारा गार वारा....
शब्द कधी त्याग,शब्द कधी भोग,
हाच शब्द अचानक,होवुन जातो योग.......
शब्द एक देव, शब्द एक दानव,
या दोन्ही मध्ये फक्त, अडकतं असतो मानव.....
शब्द तुझे रुप,शब्द तुझा रंग,
ह्याचं रंगातो,तो अळवावरचा थेंब......
शब्द तुझे डोळे,शब्द तुझेचं श्वास
ह्या शब्दात खेळताना,मज होतो तुझाचं भास......
शब्द एक आठवण, शब्द मायेची पाखरण
हळुचं होवुन जातो शब्द, ह्र्दयाचे एक स्पंदन .........
शब्द एक शस्त्र, शब्द एक अस्त्र
श्रीक्रष्ण बनवतो शब्दाला, द्रौपदीचे वस्त्र .......
शब्द नेहमीच सदगुरु,शब्द दोन कल्पतरु
ह्या शब्दांच्या लाटेमध्ये कसे मी मज सावरु......
कवयत्री : मिनल
No comments:
Post a Comment