तुझ्या जिकंण्यावर लिहु
की माझ्या हरण्यावर लिहु
का मनातल्या सा-या वेदनान्वर लिहु..?
आपल्यान्च्या भावानान्वर लिहु
का परक्यान्च्या कहान्यान्वर लिहु..?
नव्या जोमाने उगवणा-या सुर्यावर लिहु
की चान्दण्यान्ना लाजवणा-या चंद्रावर लिहु..?
निराश बुडत्या सुर्याला पाहु
कि उमलत्या फ़ुलान्च्या श्वासावर लिहु..?
क्षणात सरणा-या आयुष्यावर लिहु
का न सरणा-या दिर्घ रात्रीन्वर लिहु..?
तुला माझ्या जवळ लिहु,
कि तुझ्या दुराव्याच्या जाणिवेवर लिहु..?
आन्धळया डोळ्याने दिवस पाहु
की डोळ्यामधली रात्र लिहु..?
चंचल, खोडकर बालपणावर लिहु
कि जीवनाच्या सरत्या तिन्हीसान्जेवर लिहु..?
त्या पहील्या नितळ प्रेमावर लिहु
कि आत्ताच्या एकटेपणावर लिहु..?
श्रावाणातल्या पावसावर लिहु
की डोळ्यातुन ओघळणा-या अश्रुन्वर लिहु..?
गीतेतल्या अर्जुनावर लिहु
कि लन्का , रावण, रामावर लिहु..?
मी हिन्दु, मुसलमान, शीखान्वर लिहु
कि सग़ळ्यान्ना 'माणुस' लिहु..?
वेगवेगळ्या धर्मावर लिहु
का "माणुसकीच्या" एकाच धर्मावर लिहु..?
तुझ्या जिकंण्यावर लिहु
की माझ्या हरण्यावर लिहु,
का मनातल्या सा-या वेदनान्वर लिहु॥?
कवी : ...............
No comments:
Post a Comment