आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, May 17, 2007

~:~ दुनियेचा चेहरा ~:~

दोन चेहरे घेऊन प्रत्येकाला जगाव लागत
ओठांवर एक अन् पोटात एक असच हल्ली वागाव लागत
पॉलिश केलेल हास्य दाखवून आतला गंज झाकावा लागतो
आणि शक्य नसले तरीसुद्धा मोठेपणा दाखवावा लागतो !

"माझ आयुष्य सर्वात सुंदर" अस चारचौघात म्हणाव लागत
नक्की खर काय ? ते विचार करून जाणाव लागत
इतरांच्यात नाटकी वागून शहाणपणा मिळवावा लागतो
अन् शहाणपणाच्या नावाखाली खरा स्वभाव पळवावा लागतो !

स्वत:शी प्रामाणिक अस सध्या कोणी रहातच नाही
अस कोणी राहील तरी दुनिया त्याच्याकडे पहातच नाही
"एक वेडा" म्हणूनच मग त्याला हिणवतात सगळे
मग समजूतदारपणे तोच आपले आयुष्य करतो वेगळे !

खेळण्यासारखे आयुष्य जगून काय करायचे इथे ?
प्रतिभेपेक्षा प्रलोभानानांच किंमत जास्त येते
पण प्रतिभेच महत्व समजायला तर हव
प्रलोभनांच दुष्टचक्र थांबायला तर हव !

माणूस हा असाच जगणार शोभेच्या बाहुलीसारखा
स्वत:मधल्या अस्तित्वालाही मग होईल तो पारखा
मग शेवटी उमगेल त्याला, आपण किती खोटे वागलो
स्वत:लाच स्वत:साठी किती वेळा महागलो !

तेव्हा मात्र तो त्यावर काहीच करू शकणार नाही
कारण तेव्हा निघून गेली असेल........ वेळही अन् काळही !

-- तन्मय पाठक

No comments: