आनंद क्षण.... पावसातले.. आनंद क्षण.... ग्रिश्मातले.... आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले... आनंद क्षण.... आईच्या कुशितले... आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले... आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...
आजचा विशेष
मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे
-- आनंद काळे
बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.
Tuesday, April 17, 2007
लग्न म्हंजे काय रे भाऊ...
देशोदेशीच्या संस्कृतींमध्ये 'लग्न' या संस्काराबद्दल नेमक्या काय भावना असतात, हे व्यक्त करणाऱ्या या म्हणी.
लग्न म्हणजे...
1. बाहेरून अतिशय आकर्षक दिसणारा सोनेरी पिंजरा. (न्यूझीलंड)
2. महागांत महाग रत्न मिळवण्याची जुनी प्रथा. (इराण)
3. वृक्षाची थंडगार सावली. (चीन)
4. कोळ्याचं जाळं. (जर्मनी)
5. दोघांचे एक आणि एकाचे अनेक करण्याची अद्भुत कला. (इराण)
6. मोती शोधण्यासाठी समुदात घेतलेली उडी. (जपान)
7. गुणाकार-भागाकार; पण अखेर वाढ होतच राहते. (पोलंड)
8. पूर्वजांच्या पावलावर पाऊल. (मेक्सिको)
9. एक अशी आपत्ती, जी अनिवार्य असते. (डेन्मार्क)
10. नदी आणि नौका यांचा संगम. (रशिया)
11. वसंताचं आगमन. (इटली)
12. एक जुगार! डावपेच जाणणाऱ्याचाच यात निभाव लागेल. (स्कॉटलंड)
13. जीवनाचा आरंभ. (स्पेन)
14. अंधारात दिव्याचा प्रकाश. (इजिप्त)
15. स्वर्गाचं पृथ्वीवर आगमन. (ऑस्ट्रिया)
16. काटेरी पण सुगंधी गुलाब. (वेल्स)
17. वृक्षाभोवती वेढे घालणारी अमरवेल. (थायलंड)
18. नवं घर, नवं जीवन, सारं काही नवं नवं. (रूमानिया)
19. धावत्या गाडीचं स्टेशन. (लाटविया)
20. धरतीचा श्रृंगार (नॉर्वे)
२१. साहसी पर्वतारोहण. (हंगेरी)
२२. वेड्याला शहाणे बनवणारा एक उपचार. (ग्रीस)
२३. एक विहीर, जिच्यात फारच थोडे जण पोहू शकतात. (पशिर्या)
२४. भावनेच्या उसळणाऱ्या लाटांना सापडलेला किनारा. (तुर्कस्थान)
२५. जीवनाचा उष:काल म्हणजे प्रेम आणि संधिकाल म्हणजे लग्न. (फ्रान्स)
26. तारुण्यात आनंद लुटून घ्या, नंतर लग्न करायचे आहेच. (जर्मनी)
27. चांगला जावई म्हणजे मुलाचीच प्राप्ती, आणि वाईट जावई म्हणजे मुलगीही गमावली. (फ्रान्स)
28. लग्नापूर्वी डोळे पूर्ण उघडे ठेवा, नंतर ते अर्धमिटलेच राहतात. (अमेरिका)
29. औषधाची गोळी गिळताना जसा विचार करायचा नसतो, तसंच लग्न करतानाही विचार करू नये. (हॉलंड)
30. लग्न करण्यापूवीर् किंवा बर्फावरून धावण्यापूवीर् जेवढा जमेल तेवढा विचार करा. (डेन्मार्क)
31 पहिले लग्न : कर्तव्य, दुसरे लग्न : चूक, तिसरे लग्न : वेडाचार। (सौदी अरेबिया)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment