एकटा नाही मी अजून
एकटा नाही मी अजून
तुझ्या आठवणीं माझ्याकडे आहेत
भंगलेल्या शपथांची राख आणि
माझ्याच हृदयाचे तुकडे आहेत
एकटा नाही मी अजून
काही जख्मां जिवंत आहेत
दु:ख कोणाकडे हलकं करावं
हा तर अनोळखी प्रांत आहे
एकटा नाही की अजून
चहूकडे स्वप्नांचा भंगार आहे
कोरड्या, थकलेल्या डोळ्यांत
अश्रूंचा अंगार आहे
एकटा नाही मी अजून
फाटकी कवितेची एक डायरी आहे
तू नसलीस म्हणून काय झालं
तुझ्या आठवणींचे सगे-सोयरी आहेत
एकटा नाही मी अजून
काही वादळांचा सहवास आहे
मी शोधतोय मोक्षांच्या वाटा
जगतोय तो अधांतरी प्रवास आहे
एकटा नाही मी अजून
तू येण्याची आस तेवत आहे
आत्मा माझा अमरतेचा दास, नाहीतर
तोही मृत्यूच्याच कवेत आहे।
कवी : अज्ञात
No comments:
Post a Comment