मला ही कविता एका विरोपामधून माझ्या गूगलच्या "आनंदक्षण" ग्रुप वर आली आणि वाचताच ग्रुपवर एक नियम लादला.
यापुढे सर्वांनी ग्रुपवर मराठीमध्ये बोलायच आणि याचा सगळ्यान्नि स्वीकार केला.
जर या पोस्टने एखादा जरी मराठी मधून बोलू लागला तर सार्थकी लागेल ही पोस्ट.
इंग्रजीच्या नादापाई झाला मराठीचा डब्बा गोल
मराठी मानसा आता तरी तू मराठीतून बोल...
इंग्रजीच्या पेपरात होऊन जाते वर्ग सारा पास
पण मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास...
प्रेम करतो तुझ्याशी म्हटले की पोरगी समजते हेंबाड्या
अन आय लव यु म्हटल्यावर मनात मारते उड्या...
माय झाली मॉम आणि बाप झाला आता डयाड
रेव्ह पार्टीत नाचून श्यान पोर झाली मॅड...
भांडण करते बायको घरात बाबुला इंग्रजी शाळेत टाका
मराठी माणसापासून आहे खरा मराठी भाषेला धोका...
मराठी इसरत चालल शाळेतले शिक्षण
मराठी औक्सीजनवर अन चालू आहे इंग्रजीचे रक्षण...
ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी, आठवा मराठीचा गोडवा
मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे असतो गुडी पाडवा...
सावध व्हा मित्रहो, जपा मायबोली मराठी
मराठीतूनच बोला सारे मराठी रक्षणासाठी...!!!
कवी : अद्न्यात
स्त्रोत: विरोप
No comments:
Post a Comment