मध्यंतरी माजी पंतप्रधान श्री० अटल बिहारी वाजपेयी यांनी १९६७ साली लोकसभेत केलेल्या एका भाषणासंबंधीचा लेख मला वाचायला मिळाला. चारशे-पाचशे वर्षांपूर्वी इंग्रजी भाषा अत्यंत मागासलेली होती आणि खुद्द इंग्लंडमध्येसुद्धा लोकांना इंग्रजीबद्दल आत्यंतिक न्यूनगंड वाटत होता. पण शेवटी सतराव्या शतकाच्या मध्याला जनमताच्या रेट्याला मान देऊन इंग्रज सरकारने निश्चयाने कायदे करून इंग्रजी भाषेला स्वतःच्या देशात हक्काचे आणि वैभवाचे स्थान कसे मिळवून दिले याची माहिती वाजपेयींनी लोकसभेत सांगितली आणि तशा प्रकारे वैभव मिळवणे भारतीय भाषांनासुद्धा कठीण नाही असे त्यांनी प्रतिपादन केले. तो लेख वाचून माझी जिज्ञासा जागृत झाली व मी या विषयी अधिक माहिती महाजालावरील विकिपीडिया सारखी संकेतस्थळे व वाजपेयींनी उल्लेख केलेला संदर्भग्रंथ यांमधून मिळवली. सर्व माहिती संकलित केल्यावर एक 'सुरस आणि विस्मयकारी' कथा हाती लागली, तीच पुढे देत आहे.
संपूर्ण लेख इथे उपलब्ध आहे....
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=13091:2009-10-03-18-36-31&catid=195:2009-08-14-03-11-12&Itemid=206
कळावे,
आनंद काळे
सुखं वा यदि दुःखं, प्रियं वा यदि अप्रियं
प्राप्तं प्राप्तं उपासिते. हृदयेन अपरजितः
http://labs.google.co.in/smschannels/subscribe/AnandKshan
http://groups.google.com/group/anandkshan
http://tavalaki.blogspot.com
No comments:
Post a Comment