आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, November 16, 2007

ऋतू आलाय बहरावर,
कोकीळ गातोय आंब्यावर,
मलाही आता राहवत नाय,
सूरात सूर मिसळत जाय,
कसा निघेल इथुन पाय, वेड लागलंय नाहीतर काय !

अशी वेळ एकांताची,
अशी रात्र विरहाची,
आता चंद्र उगवलाय,
तुही बेचैन सांगू लागलाय,
कसा निघेल इथुन पाय,वेड लागलंय नाहीतर काय !

इष्काच्या दुनियेत शिरलो काय,
कवितेवर कविता सुचत जाय,
काही नाही त्यात तुझ्याशिवाय,
आहे का याला काही उपाय,
कसा निघेल इथुन पाय, वेड लागलंय नाहीतर काय !

अचानक तू येतेस काय,
मला मिठीत घेतेस काय,
घुसळून निघतात भावना सार्या,
मन आकाशापल्याड जाय,
कसा निघेल इथुन पाय, वेड लागलंय नाहीतर काय !

- प्रणव-सुजीत
http://pranaavsays.blogspot.com/

दुःखांशी हितगुज करणे, ही सवयच मजला आहे
बहुतेक व्यथा गोंजरणे, ही सवयच मजला आहे

जन कितीक मज समजवती, हसूनी ते ऐकून घेणे
परी फक्त मनाचे करणे, ही सवयच मजला आहे

ही खुणवतात जरी मजला, कितीवार उद्याची स्वप्ने
भुतकाळाशी घुटमळणे, ही सवयच मजला आहे

पूष्पांच्या सौंदर्याचे, सारेच दिवाणे परंतू
काट्यांशी सलगी करणे, ही सवयच मजला आहे

जग भुलते ह्या चेहे-याला, जो सदैव हास्यच ल्यातो
एकटेच मग गहिवरणे, ही सवयच मजला आहे

भरूनी आलेल्या जखमा, विसरून गेलेली दुःखे
सा-यांना गोळा करणे, ही सवयच मजला आहे

असतील कितीकही घुसले, खंजिर जरी पाठीत
शत्रूस उराशी धरणे, ही सवयच मजला आहे

त्यांनी संपवण्या मजला, केले किती घाव परंतु
सर्वांना पुरूनी उरणे, ही सवयच मजला आहे

आशिष्‌
तू समजुन का घेत नाही..........
कसं गं तुला काही समजत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही !

इतक्या सहजासहजी जाऊ का विचारतेस,
भावना का माझ्या तुला जाणवत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला करमत नाही !

तू दुर असलीस की जगही खायला उठतं,
कशातच लक्ष माझं लागत नाही !
एवढही तुला कसं कळत नाही,
तुझ्याशिवाय माझ्या जगण्यालाच अर्थ नाही !

कधी कधी असं वाटतं,
तू फक्त दाखवतेस की तुला समजत नाही !
माझ्या भावना तू चांगल्या जाणतेस,
पण मुद्दामच तू मला भेटत नाही !!

न भेटण्याने आता काही होणार नाही,
मी तुझ्याशिवाय क्षणभरही जगु शकणार नाही !
आपले मिलन ही तर दैवाचीच इच्छा,
त्याला तू किंवा मी टाळु शकणार नाही !!

तुझं नि माझं जन्मोजन्मीचं नातं आहे,
हा काही आज उद्याचा खेळ नाही !
तुझ्याशिवाय मी आणी माझ्याशिवाय तू,
असं स्वप्नातही शक्य होणार नाही !!

किती साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तू हे समजुन का घेत नाही...

कवी: अद्न्यात
एकदा ती माझ्याकडे आली
माझ्याबरोबर 'चल' म्हणाली,
'हो' म्हणायच्या आतंच ती
देऊन हात, घेऊन गेली
होतो सोबत आम्ही चालत
कधी शांत कधी बोलत,
पायवाट निळसर नव्हती संपत
नभी चांदणे, चंद्रासंगत
गोड गप्पा नव्हत्या थांबत
सुरेल आवाज जणू कोकिळेगत
मौनामधे भासे दिव्य एक रंगत
अनवट सूर, बासरीचे उमलत
हसताना ती बाहुली दिसायची
बारीक डोळे अलगद लाजायची,
गालांवर खळी नाजुक पडायची
नयन शिंपल्यात, जपावी वाटायची
तरूतळी एका आम्ही बसलो
मनीचे सारे तिला मी वदलो,
हात थरथरता तिच्या हातात
परि नजर थेट डोळ्यात
काय झालं पूढे सांगत नाही
स्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,
झालो जागा तरी उठलो नाही
करत विचार पडलो मी,
प्रेमामधे तर पडलो नाही !

-- चंदू

असं फक्त प्रेम असंत
त्याला हृदयातचं जपायचं असतं
आभाळाइतकं विशाल, अणूरेणूइतकं सूक्ष्म
स्वैर विहार करणारं, बन्दिवान करणारं
सुखाचा महासागर, दुःखाचा डोंगर
हास्याचा फुलोरा, कोसळणारा अश्रुंचा मनोरा
फुलपाखरासारखं चंचल, दगडासारखं अचल
कधी शहाणपणाचं, कधी मुर्खपणाचं
वाट बघायला लावणारं, कधी मुर्खपणाचं
निःस्वर्थी त्यागी, नाहीतर स्वार्थी भोगी
प्रेमात अधिकार असतो
पण गाजवायचा नसतो
प्रेमात गुलाम असतो
पण राबवायचा नसतो
प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं
पण स्वतःला स्वातंत्र्य नसतं
नेहमीच एकट्याचं असतं
पण दुसऱ्याशिवाय शक्य नसतं
कळत नकळत कसं होतं
ते मात्र कधीच कळत नसतं
... असं फक्त प्रेमच असतं

कवी: अद्न्यात

प्रेम म्हणजे प्रेम, केवळ प्रेमच असते,
दुसरे तिसरे काही काही काहीही नसते ॥

ते एक हळुवार भावनांचे नाजूक नाते असते,
भावभऱ्या मनाचे, सुरिले गीत असते ॥

तिथे तुझे माझे,माझे तुझे काहीही नसते,
जे काही असते ते सारेच परस्परांचे असते ॥

एकदा आपले मानले, की मग सारेच मानायचे असते,
नि पावलापावलावर परस्परांना सदैव सावरायचे असते ॥

एकमेकांत मिसळून, विरघळायचे असते,
नि स्वत:चे स्वत्व दुसऱ्यांत पाहायचे असते ॥

सारेच्या सारे कधीही, कुठेच पटत नसते,
नि म्हणूनच बरेचसे तडजोडीने मिळवायचे असते ॥

प्रेम मिळावे लागते, मिळाले तर कळावे लागते,
एकदा कळले की मग, सदैव वाढवायचे असते ॥

प्रेम नशिबाची गोष्ट असते, ते नशिबवंतांनाच लाभते,
पण आपणच नशीबवान आहोत हे मात्र कळावे लागते ॥प्रेम म्हणजे प्रेम, केवळ प्रेमच असते,
दुसरे तिसरे काही काही काहीही नसते ॥

ते एक हळुवार भावनांचे नाजूक नाते असते,
भावभऱ्या मनाचे, सुरिले गीत असते ॥

तिथे तुझे माझे,माझे तुझे काहीही नसते,
जे काही असते ते सारेच परस्परांचे असते ॥

एकदा आपले मानले, की मग सारेच मानायचे असते,
नि पावलापावलावर परस्परांना सदैव सावरायचे असते ॥

एकमेकांत मिसळून, विरघळायचे असते,
नि स्वत:चे स्वत्व दुसऱ्यांत पाहायचे असते ॥

सारेच्या सारे कधीही, कुठेच पटत नसते,
नि म्हणूनच बरेचसे तडजोडीने मिळवायचे असते ॥

प्रेम मिळावे लागते, मिळाले तर कळावे लागते,
एकदा कळले की मग, सदैव वाढवायचे असते ॥

प्रेम नशिबाची गोष्ट असते, ते नशिबवंतांनाच लाभते,
पण आपणच नशीबवान आहोत हे मात्र कळावे लागते

कवी: अद्न्यात

Thursday, November 15, 2007


माझ्या रे चंचल मना
नको होऊ सैर-भैर
थांब क्षणभर इथे
चित्त करूनिया स्थिर ।
भार प्रपंचाचा किती
वाहशील रे उगाच
त्याच्या प्रश्नांचा गुंता
सोडविता तुला धाप ।
माझे माझे करूनिया
किती जोडशील वित्त
सोड सर्व राही इथे
नको त्यांत लावू चित्त ।
ह्या देहाला जगवाया
पुरे दोनच भाकरी
नको व्यर्थ आटापिटा
नको कुणाची चाकरी ।
गेला जन्म उठाउठी
आता तरी लाव ध्यान
त्या परम ईश्वरात
तोच तुझं राखी भान।
त्याच्यातच हो रे दंग
त्याचेच करी भजन
त्याचेच तू गा अभंग
दिन रातीचं स्मरण ।
असं जेंव्हा करशील
तोच करील सांभाळ
सुखी अखंड होशील
त्याचेच तू होई बाळ ।


-- आशा जोगळेकर
http://asha-joglekar.blogspot.com/

Wednesday, November 14, 2007

केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?
उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली!

उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली!

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली!

आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी..
हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली

अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा..
गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली?

-- सुरेश भट
बायकांचं जग

कोण म्हणतो जग पुरुषांचं आहे. अहो, नीट पाहा . जग बायकांचं आहे. स्त्रीप्रधानच संस्कृती आहे आपली.

त्याला वर्गात पोहोचायला उशीर झाला, तर शिव्या पडतात.

तिला उशीर झाला, तर ' हल्ली बसेस लेटच येतायत' म्हणून सरच तिचं स्वागत करतात.

त्यानं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर म्हणतात, '' साला लाइन मारतोय बघ!''

ती त्याच्याशी बोलली, तर फक्त विशुद्ध मैत्री.

ती रडली, तर ती म्हणेल ते खरे.

तो रडला तर म्हणतात, पोरींसारखे रडणे शोभत नाही बरे.

मुलीला अपघात झाला, तर ती इतरांची चूक.

मुलाला अपघात झाला, तर ती फक्त त्याचीच चूक.

मुलगा स्त्रियांसाठी राखीव जागेवर बसला, तर तो मॅनरलेस, असंस्कृत.

मुलगी इतर सीट्सवर बसली, तर तिचा तो हक्कच.

तिनं मुलासारखा पोशाख केला, तर तिला आधुनिक म्हणतात.

त्यानं मुलीचा पोशाख केला, तर त्याला... तुम्हाला माहितीये काय म्हणतात!!

""बाई, लईंच शिकल्याली दिसत्येय तुमची सुनबाई...!''
मालती मानकामे भाजीवालीनं दिलेल्या "कॉप्लिमेंट्‌स'नं ज्योत्स्नाबाई देशपांडे फारच सुखावल्या.
आज त्या सुनेला घेऊन पहिल्यांदाच भाजी मंडईत आल्या होत्या. नेहमीच्या भाजीवालीनं केलेल्या कौतुकानं त्यांच्या अंगावर मूठभर मांस चढलं. बाह्या (नसल्या तरी) फुरफुरल्या.
पांढऱ्याशुभ्र साडीच्या पदरावर चिकटलेला धुळीचा कण हातानं उडवत टेचात म्हणाल्या, ""मग, पुण्याची आहे ती पण! नाव पण "प्रज्ञा' आहे तिचं. चांगली "एमबीए' आहे म्हटलं ! उगाच नाही, देशपांड्यांच्या घरची सून झाली!...का गं, पण तू का विचारत्येस?''"

"न्हाई...शेवंताकडंनं घेतलेल्या पिकलेल्या टॉमॅटोंच्या पिशवीत कोबीचा मोठा गड्डा बाद्‌कन टाकला तिनं, तवाच वळखलं म्या!'' मालती मानकामेनं खुलासा केला.

आयुष्याला fullstop लागायच्या आधी......

आयुष्याला fullstop लागायच्या आधी
काहीतरी करून दाखवायचय,
लाखोन्च्या गर्दीत स्वतःसाठी
'red carpet' बनवायचय !!

आयुष्याला fullstop लागायच्या आधी
काहीतरी करून दाखवायचय,
आरशासमोर उभ राहून
नजर वर करून 'त्याला' बघायचय,
ताठ मानेनेच 'त्या' समोरच्याला विचारायचय,
तू फ़क्त बोल,अजून कोणत क्षितिज गाठायचय!!

आयुष्याला fullstop लागायच्या आधी
काहीतरी करून दाखवायचय,
सर्वान्च्या मनात एक छोटस
घर करून राहायचय,
माझ्या नुसत्या आठवणीन्तूनच
दुःखी मनान्ना हसवायचय,
एकदा का fullstop लागला
की आठवणीन्तूनच मला पुन्हा जगायचय!!

-- प्राची

आजकाल सगळ्यांपासून दूर राहू लागले आहे ...
एकटीच बसून फ़क्त तुझाच विचार करू लागले आहे,
भर दिवसा चांदण्या रात्रीची स्वप्नं पाहू लागले आहे ...
कोणी सांगेल का .... काय मला झाले हे ???

सगळेच आपले आता परके वाटू लागले आहे ...
तुझ्याजवळ राहण्यासाठी, मन बहाणे शोधू लागले आहे,
तुझ्याशी बोलताना मन धुंद-धुंद होऊ लागले आहे...
कोणी सांगेल का .... काय मला झाले हे ???

तुला पाहताच तुझ्या डोळ्यांमध्ये हरवू लागले आहे...
तुझ्याच प्रितीचे सूर ह्र्दय छेडू लागले आहे,
काय सांगू पण आता मी माझी न राहिले रे ...
कोणी सांगेल का .... काय मला झाले हे ???

-- श्वेता पोहनकर

ओझं

युद्ध नुकतेच संपले होते, रणंभूमीवर प्रचंड पराक्रम गाजवुन सैनिक आपापल्या घरांकडे परतले होते. घरापासून दूर राहून पाच वर वर्षे लोटली होती . या काळात किती किती बदल झाले होते. युद्धाने सगळे काही बदलून टाकले होते.
पाच वर्षे! गेलेली पाच वर्षे परत आयुष्यात कधीच परतणार नव्हती. कुणाचा अट्टहास आणि कुणाचा बळी ! एकमेकांशी साधी तोंडओळख नसणारे जवान गडी, एकमेकांना जीव घेण्यास आतुर झाले होते. आणि ते अशा कोणाच्या सांगण्यावरून, ज्याला त्यांनी प्रत्यक्षात कधीच पाहिले नव्ह्ते.
पण आता परत वसंत पुन्हा फुलणार होता. ते भयाण वास्तव एखाद्या दुस्वप्नासरखे संपले होते. घरी जायच्या ओढ़ीनं आशुतोष नुसता बहारला होता. आई-बाबा त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते.

आशुतोष ने घरी फोन लावला. बाबांचा आवाज कानी पडताच गात्रं फुलून आली. बाबांना आनंदाचा आणि अभिमानाचे भरतं आले. गेल्या सहा महिन्यात अशुतोषशी - लड़क्या आशुशी साधं ऑपचारिक बोलन्यालाही ते पारखे झाले होते.
"बाबा, मी इथून उद्या निघतो आहे; दोन दिवसांनी घरी पोहोचेन," आशु म्हणाला- " पण बाबा, मला तुमची एक मदत-परवानगी म्हणा तर हवी आहे..."
"अर्थाताच ! बोल बाळा ..." बाबा म्हणाले !
"बाबा, माझ्या बरोबर माझा एक सैनिक मित्रही येणार आहे."
"अरे, ही तर आनंदाची गोष्ट आहे! आम्हां दोघा म्हातार्यांना त्याला भेटायला खूप आवडेल..." बाबा म्हणाले.
"पण बाबा, त्याच्या बद्दल एक गोष्ट तुम्हाला ठाऊक असणे अतिशय आवश्यक आहे," आशु म्हणाला - "युद्ध भुमिवर लढ़ता लढ़ता तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याचा पाय एका सुरंगावर पडला अणि हात अणि पाय त्याने गमावाला. त्याचे बिच्यार्याचे या जगात कोणी नाही. त्याला कूठेच आसरा नाही! माझी इच्छा आहे की त्याने आपल्याबरोबरच राहावं ! "
बाबा गंभीर झाले, " बाळ, मला तुझ्या मित्राबद्दल खरच खूप वाईट वाटतं . आपण त्याला मदत करू, हे नक्की. त्याला आपण जवळच कोठे तरी राहण्याची सोय करून देवू., ""
"नाही आई-बाबा:" मला तो आपल्याबरोबरच रहायला हवा आहे..." ठाम स्वरात आशु बोलला!"
"बाळ", बाबा समजावणीच्या स्वरात म्हणाले-" तुला भावनेच्या भरात हे समजत नाही की तू नक्की काय करतोय!" अशा अपंग व्यक्तिंची -मग तो कितीही जवळचा असला तरी जबाबदारी पेलणं फार कठीन असतं. आपणा सर्वांवर तो एक भार होवून राहिल. माझे ऐक, हा वेड़ा हट्ट सोड आणि ताबडतोब घरी ये! तुझा मित्र त्याच्या जीवनासाठी दूसरा मार्ग नक्कीच शोधेल. आपण सर्वच त्याला मदत करू......."
"...क्लिक ..." आशुने फोन नुसताच ठेवून दिला...
....महीना उलटला..... आशु घरी आला नाही. बाबा सतत फोंनजवळ बसून राहिले; आईच्या डोळ्यांची धार खलेना.... त्याचा संपर्कही होऊ शकला नाही .
.... आणि एक दिवशी अचानक दारी पोलिस उभे राहिले!
"तुमचा मुलगा आशुतोष एक उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली पडला व त्यात त्याचा मृत्यू झाला. ! पोलिस म्हणाले....
"... पण एकंदर परिस्थितीजन्य पुरावा पाहता, अपघातापेक्षा ही आत्महत्येची शक्यता जास्त वाटते..."ते पुढे म्हणाले!
आई-बाबांना मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी शहरात यावे लागले.... एक शासकीय इस्पिताळात माँर्गमध्ये बाबा गेले... तिथल्या अटेंडंटने ड्रावर उघडला आणि बाबा जागच्या जागी थिजून गेले....
...तो मृतदेह लड़क्या अशुशाचाच होता...पण त्याला केवळ एक हात व एकच पाय होता...!

स्त्रोत : लोकसत्ता अंक
योगदान : संदीप

काय केलाय मी असा गुन्हा
तवा काढताय माझी खोडी पुन्हा पुन्हा हो पुन्हा पुन्हा...

मी तर आपली साधी भोळी,
जरीचा पदर अन अंगात माझ्या छापील चोळी,
पाहून मला असं नजरत का हो धरता
वर खाली बघून मला मिठित का घेरता..
आहो पाव्हणं आता जरा थांबा ...

काय केलाय मी असा गुन्हा
तवा काढताय माझी खोडी पुन्हा पुन्हा हो पुन्हा पुन्हा...

आता झालीया येळ तिन्ही सांजची,
वाट माझी ही बांधा-बांधाची,
डोईवर माझ्या टोपलं
अन बिगी-बिगी चालताना काटुक माझ्या पायाला टोचलं
राहूद्यात , माझ्या पायाला हात घालण्याचा तुमचा बहाणा

अन सांगा राया काय केलाय मी असा गुन्हा ,
तवा काढताय माझी खोडी पुन्हा पुन्हा हो पुन्हा पुन्हा..

रातीचं चांदण माझ्या गालात हसतयं
चंद्राच तोंड माझ्या डोळ्यात दिसतय,
पाहून हे सारं नका खेचू माझ्या पदराची किनार
आता मला माझचं भ्या वाटतयं
अन तुमच्या मिठित यायला माझं अंग धावत सुटतयं..

आता व्हयील माझ्या हातून गुन्हा
तवा नका काढू अशी चावट खोडी पुन्हा पुन्हा...

--- आ. आदित्य...

मनीमाऊ मनीमाऊ.........
रोज म्हणते पाहिजे माला खाऊ..........

आइस्क्रिम खाते.......फ्रूटज्यूस पीते.....
च्यायनिज खाते.......कधी फ़क्त चोकलेट वरच भागते....

रोज म्हणते भेटायला ये.......
उंदिर पकडायला तुझी मदत दे....

होतो तिला उशीर कधी कधी.......
माघ sorry बोलायची चुकवत नहीं ती संधी......

टनाटन उड्या मारत मग होटेलात जातो......
मांजरी बरोबर बोका पण खाऊचा फडश्या पाडतो.......

मनीमाऊ मनीमाऊ.........
उद्या म्हणते परत येऊ........ताव मारून उंदिर खाऊ.......

-- अमरीश अ. भिलारे

ही वाट असे अंधाराची
अन थिजल्या काळोखाची
ही वाट असे उन्हाची
अन भयाण वाळवंटाची

हिरवीगार झाडी
अन थंड शीतल वारा
त्रुप्त मनी वर्षती
त्या पावसाच्या धारा

हा तर तव श्रान्त मनाचा
अविश्रान्त खेळ सारा
का व्यर्थ मांडिशी तू
स्वप्नांचा हा पसारा

ही वाट असे अंधाराची
हे वास्तव स्विकारावे
अन त्या थिजल्या वाटेलाच...
आपलेसे करावे

- महेश
कॉलेज मध्ये असताना
भेटीगाठी व्हायच्या
क्त्ट्यवरचा चहा
वादाची लज्जत वाढवायचा
घोळकयात असताना
दोघच दोघ असायचो
एकटे एकटे असताना
सगळेच सोबत असायचो
कालपारवा भेटलो तरी
मधली तास युग वाटायची
फॉनेवर गप्पा मारायला
तेव्हा केवढी मजा वाटायची
आयुष्याच्या वळणावर
अवचित भेट झाली होती
दोघांच्या मनाने तेव्हा
मैत्रीची गाणी म्हटली होती
अंतर दोघांमधले
निमिशात दूर झाले होते
विरह तुज़ा होतच उरत
काहूर माजले होते
मी या नात्याला मैत्रीचे
नाव दिले होते
तेव्हाच तू त्याला
प्रीती असेही म्हटले होते...

-- चैताली

Tuesday, November 13, 2007

आठवणींचे जग किती अनोखं
गुंतलो एकदा की खरं जग पारखं

सापडतो कधी सानपणचा चॉकलेटचा बंगला
गावाच्या मध्यभागी असणारा अमुचा इवलसा इमला

डोळ्यांपुढे सरकते मास्तरांची छडी
मित्रांसोबत चोरुन पेरु खाण्यातली गोडी

भेटतात आईवडिलांगत प्रेम करणारे शिक्षक
टिळकांच्या भूमिकेसाठी कौतुक करणारे प्रेक्षक

ऎन मध्यान्ही रंगलेला क्रिकेटचा डाव
टुर्नामेन्ट जिंकताना घेतलेली विजयी धाव

पहिला नंबर आल्यावर मिळालेलं बक्षिस
दीड मार्क कापले म्हणून मास्तर वाटायचे खवीस

उशीरा उठलो म्हणून मिळायचा धम्मकलाडू
बॅटसाठी हट्ट करताना फ़ुटलेलं खोटं रडू

कधी दिसतं आजीच्या हातचं थालिपिठ
मुंजीच्या वेळेस आईनं कौतुकानं लावलेली तीट

अचानक ओळख दाखवतात दडलेल्या स्म्रुती
मनात जतन करुन ठेवलेले क्षण तरी किती

असे माझे दिवास्वप्न कितीदा भंगती
मॅनेजर अचानक उभा असे संगती
नाईलाजाने coding साठी पुन्हा हात सरसावतात
आयुष्याची debugging उद्या पुन्हा करू असं मनाला समजावतात!!

--- अभिजित गलगलीकर

मौन आता सखे मी पाळतो....

मौन आता सखे मी पाळतो....

मौन आता सखे मी पाळतो....
भावना मनाच्या मी जाळतो....

तू येणार नसतेस तरीही,
तुझी वाट पाहूनी कंटाळतो....

ठरवले तुला मी विसरायचे,
तुझ्या आठवांशी रेंगाळतो....

घाव ह्रदयाचा दाबून मी,
वेदना उराशी सांभाळतो....

होते वृष्टी अशी नयनांतूनी,
पुन्हा भिजूनी, पुन्हा वाळतो....

मनाच्या व्यथेची मला काळजी,
म्हणुनी तुला पाहणे टाळतो....

भोगतो कशाला अशा यातना,
नशीबाच्या रेखा मी चाळतो....

मौन आता सखे मी पाळतो....
भावना मनाच्या मी जाळतो....

कवी: निरज कुलकर्णी

दोनाचे चार होत आहेत.......
नविन दात येत आहेत......

२,४,६,८, बे चा म्हणिन पाढा......
कधी येतील मला अक्कल दाढा......??

कोलगेट ने मग दात घासीन.....
बिग बबल मग चघळत बसीन.......!

मिन्टो फ्रेश ने मग लैला होईल माझी......
अलपेंलिबे ने मग हसेल आजी.......!

मम्मीच्या मिक्सरचा आवाज होताच मग खाईन केक.....
लाड्क्या माऊ ला पण देईन चोकलेट एक.......!

दोघे मीलून मग हसत राहू........
डब्यातिल सारी बिस्कीट खाऊ........!

येतील जेंव्हा अक्कल दाढा......
ओढावा लागेल मग संसाराचा गाडा.....!

त्या पेक्षा बरा आपला बे चा पाढा.....
चारच बास झाले.......बत्तिशी ची चिंता सोडा......!

मस्त रहायच.......खुप खायच.......
पोट धरून हसत रहायच.......हसत रहायच.......!!

ही कविता माझ्या लाड्क्या रेणू ताई साठी.......
तिच्या आग्रहा वरुन मी ही कविता लिहिली आहे......!!

--अमरीश अ. भिलारे.

वेदनांची मांडतो आरास मी

भासतो त्यांना सुखाचा दास मी
वेदनांची मांडतो आरास मी!

पाहतो ते ते खरे मी मानतो
केवढे जपतो उराशी भास मी...

वेळ जो लागायचा तो लागतो
मोजतो आहे उगाचच श्वास मी

लोपले सरकारही...पाऊसही
घेतला हाती अता गळफास मी

जायचे होते तिला, गेलीच ती
थांबवू शकलो कधी मधुमास मी?

नेत नाही ती मला कोणाकडे
जे नको ते बोलतो हमखास मी!

का अचंबा वाटतो गुण पाहुनी
आजवर केला कुठे अभ्यास मी!

ओळखू आली सख्या गणिते तुझी
ऐकला जेंव्हा तुझा इतिहास मी!

कवी: समीर
डॉ. जनावरेंच्या गुरांच्या दवाखान्यात शिरलेला भेदरलेला युवक म्हणाला, 'डॉक्टर, मला ताबडतोब तपासा.'

डॉ. जनावरे म्हणाले, 'अहो मी तुम्हाला तपासू शकत नाही. आत येताना बाहेरची पाटी वाचली नाहीत का? मी गुरांचा डॉक्टर आहे, माणसांचा नाही.'

तो तरुण म्हणाला, 'ते मला ठाऊक आहे डॉक्टर, पण तरीही तुम्हीच मला तपासा.'

' कमाल आहे! चला बाहेर पडा. चालू लागा,' डॉक्टर भडकले.

' अहो डॉक्टर, आधी माझं ऐकून तर घ्या. तुम्हीच मला तपासू शकता, याची कारणं सांगतो ना मी तुम्हाला. ऐका.

मी रात्रभर ऑफिसच्याच कामाचा विचार करत कुत्र्यासारखा सावध झोपतो.

घोड्यासारखा जागा होतो. ऑफिसला हरणाच्या वेगाने पळतो.

दिवसभर, कामाचे तास उलटल्यानंतरही गाढवासारखी मेहनत करतो.

वर्षभरात सुट्टी न घेता बैलासारखा राबतो.

बॉससमोर जेव्हा तेव्हा कुत्र्यासारखी शेपटी हलवतो.

मुलांबरोबर मी माकडचेष्टा करतो

आणि बायकोसमोर प्रसंगानुरूप उंदीर, शेळी, झुरळ बनतो...'

' अरे अरे अरे! इतकी लांबण लावायची काय गरज होती,' डॉ. जनावरे मृदू स्वरात म्हणाले, 'फक्त एवढंच सांगायचं ना की मी कॉण्ट्रॅक्टवरचा कर्मचारी आहे... मी लगेच उपचार सुरू केले असते!!!

Monday, November 12, 2007

0-०-०

निसटून गेलेले क्षण
येत नाहीत परत ...
आपण त्यांच्या मागे
धावतो खुळ्यागत .....

पळत सुटलो तरी
नाही काही हाती लागत ...
आपण मात्र एकटेच
बसत बसतो कुढत ....

उद्विग्न होता आपण
सारे दूर पळतात...
दुरावा आला म्हणजे
संवाद ही हरवतात ....

आपल्या मनाचा आवाज
ऐकता आला पाहिजे ...
उत्स्फुर्तता टिकवून
स्वसंवाद झाला पाहिजे ....

मन व शरीर यांच्या
संवेदना जाणवू या...
स्वत:ला व्यक्त करण्यास्तव
कामास त्यांना लावू या....

कवी: अरविंद
http://mevamazyakavita.blogspot.com

माझ्याच विचारांनी ,
घातला मला घेराव..
केला माझ्या मनावर,
प्रश्नांचा भडिमार.....

दुर्लभ मनुष्य जन्म,
मग उपभोग काय वाईट?

जिव्हा जाणते चव,
आस्वाद घेणे काय वाईट?

नासिका जाणी गंध,
सुगंध घेणे काय वाईट?

कर्ण ऐकती ध्वनि,
लावणी ऐकणे काय वाईट?

परमात्म्याने दिली इंद्रियें,
सुखोपभोग काय वाईट?

मन थोडे सावरले,
हळूच सांगू लागले----

"करु नकोस अती की,
पर आत्म्यास होई क्लेश."

......अरविंद
http://mevamazyakavita.blogspot.com

खास तुझ्यासाठी लिहावं असं कधी वाटलं नाही
प्रेमाने तू जवळ करावं असं कधी वाटलं नाही

मनातील भाव क्षणभर थबकले
हृदयातील शब्द कागदावर ओघळले
तुझ्या प्रीतीचे कवडसे मनावर उमटले
तरी तुला भान हरपून पहावंसं वाटलं नाही

काजळ रात्रीतही प्रेम तुझे उजळले
माझ्या अंतरीच्या काठास स्पर्शून गेले
तुझे प्रेम माझ्या ओंजळीत भरलेले
तरी तुला ते हृदयात ओतावंसं वाटलं नाही

तरी याचा खेद नाही, खंत वाटली नाही
मी तुझ्यासाठी तडफडणं, याशिवाय आता काही उरलं नाही …

-- कवी: अद्न्यात