आनंद क्षण.... पावसातले.. आनंद क्षण.... ग्रिश्मातले.... आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले... आनंद क्षण.... आईच्या कुशितले... आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले... आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...
आजचा विशेष
मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे
-- आनंद काळे
बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.
Tuesday, January 11, 2011
बालभारती: आभाळाची पाटी!
बालभारती: सुरवंटराव
Tuesday, November 10, 2009
खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं???
एका छोटीचे मनोगत..
कशाला गं आईनं असं मला माललं..
ललून ललून नाक माझं लाल लाल झालं..
खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं???
अंगणामध्ये गेले होते बिश्किट खात खात..
टॉमी तिथे बसला होता त्याचा खाऊ खात..
माझ्यातलं थोलं बिश्किट मी त्याला शुद्धा दिलं..
त्याच्या भांड्यातलं थोलं मी ही खाल्लं..
सगल्यांना देऊन खायचं असं आईनीश शांगितलं..
खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं??
बाबांचा पांधला पांधला रूमाल मला मिलाला
त्याच्यावर केचपचा मी लाल सूर्य काढला..
त्यावर मग मी थोडंसं दूध सुद्धा ओतलं..
सांग आता यात माझं असं काय चुकलं..??
रूमाल सगळा लाल लाल ,होता घाण झाला..
दूध ओतून त्याला मी गोला गोला केला..
कलतंच नाही मला नेमकं काय झालं.
खलं खलं सांग आजी माझं काय चुकलं??
- प्राजु
राणी मा़झी छोटुली तू, आहेस उचापती
हसू येते मला, पाहून तुझ्या करामती
ललू नको बघ तुझे नाक झाले लाल
हस बघू, फुगवू नको गोबले गोबले गाल
हसलीस की तुला देईन गोड गोड खाऊ
संध्याकाळी फिरायला आपण दोघीच जाऊ
फुगे घेऊ, बाग पाहू, करू मस्तं धमाल
बाबांसाठी घेऊन येऊ एक पांधला रुमाल
माललं त मालू दे, आई आहेच वेडी
हसण्या रुसण्यातही अगं गंमत असते थोडी
-- (खोडकर) अनामिक
Sunday, August 16, 2009
अरे, संसार संसार
अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर !
अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं
राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं
अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं
येड्या, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं !
अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड
अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा
देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चिक्ने सागरगोटे
ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन् दुःखाले होकार
देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार !
अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार
असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार !
- बहिणाबाई चौधरी
Monday, August 10, 2009
आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय
आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय
आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय
नसतो कुठला होमवर्क न असतो कुठला त्रास
ऑफिस मधुन आल्यावर नसतो कुठला क्लास
घरी येउन आरामात टी.व्ही. पहात रहायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...
सगळे असतात फ़्रेंड आणि टिचर कुणीच नसतात
चॉकलेट देणार्या काकानां बाबा बॉस म्हणतात
छान छान बॉस कडुन रोज चॉकलेट खायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...
कॉमप्यूटरवर बसुन कसल काम करतात?
कॉमप्यूटरवर तर नुसतेच गेम असतात
रोज रोज गेम खेळुन टॉप स्कोरर व्हायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...
ऑफिसमध्ये जाउन भरपूर मज्जा करतात
तरीच बरं नसल तरी ऑफिसला जातात
ऑफिसला जाउन मला पण खेळायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...
ऑफिसच्या रिसेस मध्ये हॉटेल मध्ये जातात
हॉटेल मध्ये जाउन मस्त चमचमीत खातात
बरगर, पिज्झा, फ़्राईस आणि आईसफ्रूट खायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...
महिन्याच्या शेवटी ह्यांना केवढे पैसे मिळतात!
देव जाणो येवढ्या पैशांच हे काय करतात?
मला तर महिन्याला फक्त एकच खेळण घ्यायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...
आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय...
स्त्रोत: विरोप
Saturday, August 08, 2009
१५ ऑगस्ट ना..!
१५ ऑगस्ट ना..!
१५ ऑगस्ट ना मित्रा.
आनंदाने भरून आलाय ऊर.
पण घरीच सुट्टी एन्जॉय करूया
झेंडावंदनाचं ठिकाण आहे दूर..
१५ ऑगस्ट ना मित्रा,
सांग भारतात स्टेट्स आहेत किती ?
असतील पंचवीस तीस.
आपल्याला स्टेट्स म्हणजे यु.एस. एवढंच माहिती..!
१५ ऑगस्ट ना मित्रा,
सांग वंदे मातरम कुणी बरं लिहिलंय ?
कुणी लिहिलंय ते ठाऊक नाही
पण ए. आर. रेहमानने काय गायलंय !
पण सोड ना हे प्रश्न
यांची आता काय गरज !
"कौन बनेगा करोडपती" संपून
झालेत बरेच दिवस !
१५ ऑगस्ट ना ,
मग आश्वासनं आणि स्वप्नं विका.
ठाऊक आहे उद्याच पडणार
त्यांचा रंग फ़िका..!
१५ ऑगस्ट ना ,
मग म्हण "विविधतेत एकता".
वर्षभर मग हवी तेवढी
चिखलफ़ेक करू शकता..!
१५ ऑगस्ट ना ,
"मेरा भारत महान" जगाला ओरडून सांग .
उद्या लावायचीय व्हिसासाठी,
अमेरिकन वकिलातीसमोर रांग.
१५ ऑगस्ट ना ,
चल इतिहास आणि संस्कृतीवरची धूळ एका दिवसापुरती झटकूया .
आणि चटावरच्या श्राद्धासारखे
सत्कार समारंभ उरकूया .
काळजी करू नकोस,
असंच करत करतच या देशाने गाठलीय साठी.
छापील भाषण मात्र जपून ठेव,
पुढच्या १५ ऑगस्ट्साठी..!
स्त्रोत : विरोप
कवी: अद्न्यात
Saturday, July 25, 2009
एल्गार
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.
ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते.
गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते.
मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते
नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते.
याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते.
घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते
मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते.
-: एल्गार :-
- सुरेश भट
Tuesday, July 21, 2009
आई
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.
चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई !
वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का ? । आम्हास नाही आई
शाळेतुनी घराला । येता धरील पोटी
काढून ठेवलेला । घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया । आम्हा 'शुभं करोति'
ताईस या कशाची । जाणीव काही नाही
त्या सान बालिकेला । समजे न यात काही
पाणी तरारताना । नेत्रात बावरे ही
ऐकूनि घे परंतू । 'आम्हास नाहि आई'
सांगे तसे मुलीना । 'आम्हास नाहि आई'
ते बोल येति कानी । 'आम्हास नाहि आई'
आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे
वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे
गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला
साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला
आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला
पंचारती जनांची । ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेला
येशील तू घराला । परतून केधवा गे !
दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे
हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे
कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे
रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे
ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे
.. गीत - यशवंत
स्त्रोत : विरोप
Monday, July 13, 2009
हल्लीच्या या पिक्चर चे..
हल्लीच्या या पिक्चर चे काय खरे नाय
काय त्यात दाखवतील याचा काय नेम नाय!!
अक्षय चा भूल भूलय्या तर लय झोलच हाय
त्या पायी शेजारची आन्टी लय परेशान हाय
म्हणे पॉरग लय बिघडल होत या फॅशनच्या मुळे
त्याच्या काया पालट झाला या भूल भूलय्या मुळे
पुर्वी तोंडात 'च्या आयला' आणि अंगात बनियन घाले
आता अंगात 'भगवे' आणि तोंडात 'हरे राम' आले
दिवस भर त्याचे हे घरात 'हरे राम' चले
अन त्याचा बुडा आजोबा भी त्या सांग डुले
या पेक्ष्या तर भोसल्यांचा बंड्या लय डेंजर हाय
त्याच्या अंगात तर 'ओम शांती' चा शाहरूखच हाय
म्हणे पोरी बघत नाहीत त्याना 'सिक्स पॅक' लागतय
म्हणून हे येड रोज दहा दहा तास जिमच मारतय
मायला म्हणे आता रोज कोंबडीच खाईन
आणि एक दिवस म्हणे आता शाहरूखच होईन
'गोवा' सोडून आता रोज बदामच खाये
अन घडी घडी ला आरशयात दंडच पाहे
हे पाहून माझी माय म्हणे आता आपली 'टर्न' हाय
मला म्हणे आता तर 'सावरीया'वर शक हाय
म्या म्हटले की माय तू टेन्शना घेऊ नकोस
तुला सावराया लागेल असे स्वप्ना बघू बी नकोस
तुझ्या संस्कारात वाढलेला मी तुझा लेक हाय
काहीही झाले तरी आता आपली टर्न नाय!!
पुन्हा एकदा ती परतली..तेव्हा
तिच्याविना आयुष्य जगण्यास असह्य झालं होतं,
तिच्यावाचून मन माझं सुन्न सुन्न झालं होतं..
स्वप्नही रातीला सोडून दुर गेली होती,
झोपेलाही डोळ्यात तिचं निघून जाणं सलत होतं..
चित्त थारयावर नाही म्हणून काही सुचत नव्हतं,
तिच्या आठवणीच्या पदराभोवती माझं काळीज घोटाळत होतं…
सारं काही नरकवेदनेच्या पलीकडचं हे एकाकीपण,
अन देहात फक्त तिच्या श्वासांच जगण शिल्लक होतं..
पण…. अचानक….
पुन्हा एकदा ती भेटली अशी एकांतात तेव्हा,
काळीज माझं भितीने धडधडत होतं…
पुन्हा एकदा आभासाच मृगजळ छळणार मला म्हणून,
मन माझं थरकापाने घाबरत होतं..
तेव्हा अचानक तिच्या त्या तळहातांचा स्पर्श झाला,
तसं अंग माझं रोमारोमातून शहारत होतं…
ती म्हणाली पुन्हा आली परतून मी तुझ्यासाठी,
हे सांगताना तिच्या डोळ्यातूनही थेंबांच येणं जाणं सुरूच होतं..
नाही विचारलं मी तिला कूठे होती ? का गेलीस सोडून ?
कारण तिचं येणं माझ्यासाठी एक नव्या जन्माच नवं विश्वचं होतं…
तेवढ्यात ती म्हणाली , "नाही मी राहू शकले तुझ्याशिवाय"
ते ऐकताना खरचं माझं वाट पाहण सफल ठरत होतं…
मग आली पावसाची सर धावून आमच्या भेटीला,
अन सारं काही विसरून ऎकमेकांच्या मिठीत आयुष्य पुन्हा अंकुरलं होतं…
कवी: अद्न्यात
स्त्रोत: विरोप
Sunday, June 07, 2009
ते पण एक वय असतं
दिवसभ पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक करून घेण्याचं
ते पण एक वय असतं
हाफ चड्डीत गावभर फिरायचं
आईची नजर चुकवून डब्यातलं खायचं
ते पण एक वय असतं
मुलींच्या स्क्रॅपबुक्स भरायचं
आणि तरीही त्यांच्याशी बोलायला लाजायचं
ते पण एक वय असतं
घरी खोटं बोलून पिक्चरला जायचं
आवाज म्युट करून रात्री एफटीव्ही पहायचं
ते पण एक वय असतं
तिच्यावरचं खरं प्रेम तिला सांगून टाकायचं
तिच्या उत्तराची वाट पाहत रात्रंदिवस झुरायचं
ते पण एक वय असतं
आता छोकरी नंतर नोकरीच्या मागे लागायचं
पॅकेजचा विचार करत एम.एस.ची स्वप्नं पहायचं
ते पण एक वय असतं
लग्नाच्या 'डोमिनियन स्टेटस' आधी तारूण्यातला टोटल इंडिपेंडंस आठवायचं
आई आणि बायकोत कितीही भांडणं झाली तरी आपण मात्र शांत रहायचं
ते पण एक वय असतं
प्रिमियम्सच्या चिंतेत रात्रभर जागायचं
शेअर मार्केटच्या तालावर आपल्या इन्व्हेस्टमेंट्सना नाचवायचं
ते पण एक वय असतं
आपल्या मुलांचे सगळे हट्ट पुरवायचं
त्यांच्या साठी स्थळ शोधताना आपलं तारूण्य आठवायचं
ते पण एक वय असतं
सगळ्या जबाबदार्या पार पाडल्यावर गॅलरीत पाय पसरून बसण्याचं
आभाळाकडे पाहत फक्त यमाच्या निर्देशाची वाट पाहत बसण्याचं
Saturday, March 21, 2009
आयुष्य - एक कोड
बघायला गेलं तर
जगायला गेलं तर
अश्रूंतही एक समाधान आहे
वाटायला गेलं तर
समाधानातही चिंता आहे
जपायला गेलं तर
काट्यांतही मखमल आहे
सोसायला गेलं तर
फुलां कडूनही जख्म आहे
कुस्करायला गेलं तर
अपयशातही नवी आशा आहे
पचवायला गेलं तर
यश खूपच क्षणिक आहे
उमजायला गेलं तर
मातीतच खरं सोनं आहे
शरीर श्रमाने माखल्यावर
रत्नांची शेवटी मातीच होते
फुलांनी शरीर झाकल्यावर
निखाऱ्यांवर चालावं लागतं
कापसावर उतानी पडल्यावर
वेदनांशी स्पर्धा करावी लागते
हास्य चेहऱ्या मागे दडल्यावर
कल्पना शक्तीचं प्रगती आहे
विज्ञानाचे धडे चाळायला गेलं तर
प्रगतीच विनाशाचं कारण आहे
इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर
"त्यागा" पुढे सारचं शुल्लक आहे
विचारात गीतासार साठवला तर
उदार वृत्ती कधी कधी घातक ठरते
सुर्यपुत्र कर्ण आठवला तर....
खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलं
त्या भाग्यवंतांचं ठीक आहे
उरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पण
अगणित उत्तरांचं पीक आहे
Thursday, February 19, 2009
आठवून पाहायचो मी
आठवून पाहायचो मी काही पावसाळे
तिच्या-माझ्या संगतीत भिजलेले
हवेभोवती गंध घेवून
रानोमाळ पसरलेले. . .
आठवायचा अवचीत मग तो नदीकाठ
कमळ फुलांनी बहरलेला
चांदणीची वाट पाहत मग
तो चंद्र रात्र जागलेला. . .
जाणवायची नकळत मग ती बोचरी थंडी
गुलाबी स्वप्नातून जागवणारी
नुसतीच मग एक निरर्थक धडपड
अपूर्णततेही पूर्णत्व
शोधणारी. . .
आठवून यायची, तीची सारी वचने
अशीच कुठेशी मोडून पडलेली
प्रतिसादांना शोधणारी तीची
प्रत्येक हाक
नियतीने माझ्यापासून दूर
लोटलेली. . .
दाटलेलं धुकं मग सावकाश
पाझरायचं
ओल्या होवून जायच्या तिच्या
सगळया "आठवणी"
एखाद-दुसरां मग त्या चुकार
थेंबानी
उगीचचं भरुन यायची माझी
गोठलेली "पापणी
कवि : अद्न्यात
आज ही ती माझ्याशी
काय वेदना आहेत तिच्या मनात,
याचे गुपित मला अजुन उलगडले नाही
चेह-यावर तिच्या सदा हसू असते
मनात मात्र दडवलेले दुःख असते
पण ते तिने कधी जाणवू दिलेच नाही
तिचे अंतर्मन मला अजुन कळलेच नाही
सगळयान्बरोबर असताना हसून दुःख लपवने,
जगण्याची ही कला ती शिकली होती...
पण जेव्हा कधी बसत असे एकांतात,
तेव्हा मात्र नयनातुन अश्रु ढाळत होती
मी खुपदा विचारले तिला
पण तिने तिचे दुःख मला कधीच सांगितले नाही...
दुःख वाटल्याने कमी होते
लपवले तर जीवनास हानिकारक ठरते
हे मी फार समजावले तिला
माझी ही कळकळीची भावना तिला कधी जानवलीच नाही
ती अशी परके पनाने का वागत होती ?
का माझ्या पाशी मन मोकळे करत नव्हती ?
याचे उत्तर एकच समजले मला,
मी आपली मैत्रिण समजत होतो जिला
तिने मला आपला मित्र कधी मानलेच नाही...
आज ही ती माझ्याशी काहीच बोलली नाही.....
Friday, January 30, 2009
Thursday, November 13, 2008
ऑनलाइन
तुझं सांभाळुन बोलणं
मर्याद्शील वागणं
किति राग आला तरि
मुळिच नाहि तोडणं
तुझि प्रत्येक गोष्ट
मला भुलवत गेलि
अशि तुझि माझि
मैत्रि खास झालि
मग सुरु झाले
वाट बघायचे तास
ऑनलाइन नाहिस म्ह् णुन
डोक्याला त्रास
मग तुझा मेसेज
जरा बिझि आहे मि
पण विसरु नकोस
"यु आर स्पे शल फॉर मि"
आपले वेगळे देश
वेगळ्या आहेत वेळा
"बट आय लाइक यु"
सांगु किति वेळा?
दोन मैत्रिचि कार्डं
त्यात लिहिणं "डिअर"
रडका स्मायलि टाकला
कि म्हणे "आय केअर"
सोडुनच दिलय मिहि
मेसेंजर वर जाणं
पण मिस्ड कॉल येतो का
मोबाइल वर पहाणं
Tuesday, October 28, 2008
बालभारती- लेझिम चाले जोरात
दिवस सुगीचे सुरु जाहले, ओला चारा बैल माजले,
शेतकरी मन प्रसन्न जाहले..., छनझुन खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम चाले जोरात !
चौघांनी वर पाय ऊचलले, सिंहासनिं त्या ऊभे राहिले,
शाहिर दोघे ते डफ वाले..., ट्पढुम, ढुमढुम, डफ तो बोले..
लेझिम चाले जोरात !
दिवटी फुरफुर करू लागली, पटक्यांची वर टोंके डूलली,
रांग खेळण्या सज्ज जाहली, छनखळ झुणझिन, ढुमढुम पटढुम् ,
लेझिम चाले जोरात !
भरभर डफ तो बोले घुमुनीं, लेझिम चाले मंड्ल धरुनी,
बाजुस-मागें, पुढे वाकुनी..., झणछीन खळखळ, झिनखळ झिनखळ,
लेझिम चाले जोरात !
डफ तो बोले-लेझिम चाले, वेळेचे त्या भान न ऊरले,
नाद भराने धुंध नाचले..., छनझुन खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम गुंगे नादात् !
सिंहासन ते डुलु लागले, शाहिर वरती नाचू लागले,
गरगर फिरले लेझिमवाले..., छनछन खळखळ, झणझण छनछन,
लेझिम गुंगे नादात् !
दिनभर शेती श्रमूनी खपले, रात्री साठी लेझीम चाले,
गवई न लगे, सतारवाले..., छनखळ झुणझिन,रात्र संपली नादात्
लेझिम चाले जोरात् !
पहाट झाली - तारा थकल्या, डफवाला तो चंद्र ऊतरला,
परी न थकला लेझिम मेळां..., छनखळ झुणझिन, लेझिम खाली...
चला जाऊया शेतात् ! चला जाऊया शेतात् !!
- श्री श्रीधर बाळकृष्ण रानडे
बालभारती -गवतफुला
रंगरंगुल्या, सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे सांग लागला,
सांग तुझा रे तुझा लळा.
मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.
विसरुनी गेलो पतंग नभिचा;
विसरून गेलो मित्राला;
पाहुन तुजला हरवुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.
हिरवी नाजुक रेशिम पाती,
दोन बाजुला सळसळती;
नीळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.
मलाही वाटे लहान होऊन,
तुझ्याहुनही लहान रे;
तुझ्या संगती सडा रहावे,
विसरून शाळा, घर सारे.
- इंदिरा संत
बालभारती- टप टप टाकित टापा
टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा !
उंच उभारी दोन्ही कान
ऐटित वळवी मान-कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा !
घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इषारा, कशास चाबुक ओढा !
सात अरण्ये, समुद्र सात
ओलांडिल हा एक दमात
आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा !
- शांता शेळके
बालभारती, -फुलपांखरूं
फुलपांखरूं !
छान किती दिसतें । फुलपाखरूं
या वेलीवर । फुलांबरोबर
गोड किती हसतें । फुलपांखरूं
पंख चिमुकलें । निळेजांभळे
हालवुनी झुलतें । फुलपांखरूं
डोळे बरिक । करिती लुकलुक
गोल मणी जणुं ते । फुलपांखरूं
मी धरुं जाता । येई न हाता
दूरच तें उडते । फुलपांखरूं
- ग.ह.पाटील
