आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, December 11, 2007

कल्पना-वास्तव

मी कल्पनेत रमणारा
तू वास्तावातच जगणारी

मी कधी कल्पनेच्या शिडीने स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचतो
पण तेवढ्यात तू पाय खेचून पुन्हा वास्तवाच्या आगीत ढकलतेस
मी स्वप्नांचे ईमले बांधलेलेच असतात की पुन्हा तू
वास्तवाच्या घणाचे घाव घालून एका क्षणात उध्वस्त करतेस

मी आत्तापर्यंत चाललेली वाट फुलांची होती असे म्हणतो
तेव्हा तू लगेचच पोळलेली पावले दाखवतेस
कधी मी पुन्हा कल्पनेच्या कुंचल्याने राजमहाल रंगवतो
तर तू ,"जरा प्रॅक्टीकल जगात रहात जा" असे म्हणतेस

कल्पना आणि वास्तव यात जितके अंतर आहे
तितकेच तुझ्या आणि माझ्या विचारांमधे आहे
पण खरं सांगू ? तरी देखील तू मला आवडतेस
कारण माझ्या कल्पनेतल्या तिच्यासारखीच तू आहे

वास्तवातील ही दुःखे, ह्या वेदना, ही संकटे
सारी आपल्या पाचवीलाच पुजली आहेत गं
ह्याजन्मीचे सगे सोयरेच जणू आपले ते
जम्नभाराची साथ देणारी हीच नाती आहेत गं

तुला खरं सांगू ?
वास्तवातल्या भळ्भळ्णार्‍या जखमेवर
कल्पनेचे पांघरून घेऊन बघ
कधी तरी असेच कल्पनेच्या गावा जाऊन बघ

कधी तरी वास्तव जगातून बाहेर पडून
असेच स्वप्नांच्या गावात शिरून बघ
पोळ्लेल्या पावलांना कल्पनेच्या पायघड्यांवर ठेवून बघ
मनीच्या असंख्य वेदनांवर स्वप्नांची फुंकर घालून बघ

वास्तवात असे जगताना
कल्पनांचा गाव हिंडून बघ
कवी नाही झालीस तरी चालेल पण
कधी तरी तू देखील स्वतःला विसरून बघ......
कधी तरी तू देखील स्वतःला विसरून बघ......

.... अमित वि डांगे

No comments: