आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, October 18, 2007

सये सोबत तुझ्या जगताना
अर्थ मला जगण्याचा उलगडला
अन सुखी आयुष्याचा एक
स्वर्गसुखाचा दृष्टांत हयातीतच घडला..

सोबतीला हात तुझा हातात
अन तुझी प्रेमळ साथ
मग मार्ग माझा मला सुचला
थेट यशाच्या क्षितीजाचा पल्लाच गाठला..

सोबत तुझी प्रेमळ मिठी,
अन स्पर्श तुझे माझ्या ओठी
जिव माझा फुलासारखा लाजला
अन तुझ्याच त्या प्रितरसात भिजला..

गीत तुझे मनी गुनगुनत
मनाचे रहस्य सामोरी आले,
अन मग वेडूच ते मनं माझं
तुझ्याच मागोमाग धावत राहीले

तुझ्या चेहर्‍यावरचा आनंद तू
ओंजळीत भरून माझ्यासमोर केलास
का तु असं करून तुझ्या आयुष्याचा
हर्षसरींचा ढग मलाच देऊ केलास..

अघोरी दुखण्यात माझ्या
मलम तुझ्या सहानभूतीचा
अन दावलास मार्ग माझ्या दुखण्याला..
अगदी माझ्या आयुष्याच्या वेशीबाहेरचा..

एकट्याला अन्न गिळायला
खुप जड होत होतं..
पण तुझ्या हातून तर एका घासातच
माझं पोट नेहमीसाठी भरत होतं

खरंतर सोबत तुझ्या जगताना,
मी अर्थपुर्ण होऊन जगत आहे..
तुझ्या साथिला मी माझ्या,
जगण्याचा श्वासचं धरत आहे..

--- आ... आदित्य..

No comments: