आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, October 18, 2007

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

राजा वदला, "मला समजली शब्दावाचुन भाषा
माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा"
कां राणीच्या डोळां तेव्हा दाटुनि आले पाणी?
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

राणी वदली बघत एकटक दूरदूरचा तार
"उद्या पहाटे दुसर्या वाटा, दुज्या गावचा वारा"
पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

तिला विचारी राजा, "कां हे जीव असे जोडावे?
कां दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे?"
या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केविलवाणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

कां राणीने मिटले डोळे दूर दूर जाताना?
का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना?
वार्यावरती विरून गेली एक उदास विराणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

No comments: