आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, August 21, 2007

आठवणींचा पाउस असाच येतो
उधाणलेल्या सागरासारखा
चिंब चिंब भिजून सुद्धा
रीता कोरड्या किना-या सारखा

नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती
तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती

पावले चालत होती पण वाट संपेनाच माझी
आज एक युदध हरल्या सारख वाटत होत
आज सगळ्याच्या मनात प्रश्न होता एकच
रोज दोघं असतात पण आज हा एकच

नेहमीच राहीन जिवंत असा तुझ्या आठवणीत
देह संपला तरी तुझ्या मी देहात साठलो होतो.
तु कणा कणात शोधलस मी क्षणा क्षणात होतो
अगं कुठेच गेलो नव्हतो मी तुझ्यात सरलो होतो

तुला वाटले मी दुर गेलो आता भेट नाही
मनात डोकावल नाहीस मी मनात मुरलो होतो
जेव्हां ओघळलीस तु... डोळ्यावाटे मीही मुक्‍त झालो
इतके दिवस तुझ्या मी डोळ्यात उरलो होतो

कोसळला नाहि तो पहीला पाऊस तेव्हां
पावसाआधी ढगातुन त्यावेळी मी बरसलो होतो
स्वखुशीने तुही भिजलिस सरीत आसवाच्यां
तुझ्या खुशीसाठी मी डोळ्यात साठलो होतो

तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती
आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती

No comments: