आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, July 30, 2007

पाहुणचार...

सोंगे सगळी संपून गेली; सरत तरी ही रातच नाही
अश्या प्रवासा शेवट कुठला; अजून जया सुरवातच नाही

जेव्हा होतो घेणारा मी; दोन करांनी घेतच गेलो
वेळ आली जेव्हा देण्याची; कळले मजला हातच नाही

शिशिरामध्येही गाणारा; कोकीळ होता एक खुळा
स्वप्न भंगले त्याचे आता; वसंतातही गातच नाही

काय करू मी पेटवले घर; उजेड गावाला देण्या
शोभेचे रे दिवे चहुकडे; आत तयांच्या वातच नाही

कितीक पडलो, रडलो, हरलो; तरी खुमखुमी आम्हा किती
"शहाणपणा" हा शब्द आमुच्या; शब्दांच्या कोशातच नाही

मार्ग निवडला तूच असा की; एकही पथछाया ती नसे
सर्वे ॠतूत्‌ पायांना चटके, केवळ ह्या ग्रीष्मातच नाही

आहे माझा पाहुणचारच; खास असा की काय करू
माझ्या घरी जे दुःख येतसे; परत कधी ते जातच नाही

आशिष्‌

No comments: