आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, July 07, 2008

नसतेस घरी तू जेव्हा - एक विडंबन



नसतेस घरी तू जेव्हा
जेवणही मीच बनवितो,
पोळ्यांचे होती नकाशे,
भाजीही मी करपवितो.....

नसतेस घरी तू जेव्हा
सर्वत्रच होई पसारा,
धुळ मणामणांची साचे,
कपड्यांचा होई ढिगारा.....

नसतेस घरी तू जेव्हा
बिल लॉंड्रीचे हे येते,
वाणीही लावी तगादा,
पाकीट रिकामे होते....

नसतेस घरी तू जेव्हा
मम इमेज हरवुन जाते,
ऑफिसला जातो तेव्हा,
सर्वत्रच चेष्टा होते.....

नसतेस घरी तू जेव्हा
भांड्यांचा होतो ढीग्,
मी घासत म्हणतो, सारे
नशिबाचे असती भोग.....

नसतेस घरी तू जेव्हा
टी.व्ही.ही मजेत असतो,
नसतात मालिका रडक्या,
मी मला हवे ते बघतो......

नसतेस घरी तू जेव्हा
जग सुनेसुनेसे भासे,
ना ओरडणे ना चिडणे,
घर्-दार सुखावून जाते.....

नसतेस घरी तू जेव्हा
जीव हा पोरका होतो,
दरक्षणी तुझ्या असण्याचा
आभास बोलका होतो.....


मूल कविता : संदीप खरे
विडंबन : सुयोग कुलकर्णी

ब्लांक कॉल -- संदीप खरे



हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी ...()

कळताच मलाही मग थोडंसं काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
फोनच्या तारेतून शांतता वाहते
खूप खूप आतून अजून काही सांगते ...()

नदी नि शेतं नि वार्याची गिरकी
ढगाची विजेने घेतलेली फिरकी
वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं
"तुझा" पुढे मी खोडलेला "मित्र" ...()

टपला नि खोड्या नि रुसवे नि राग
एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग
हसायचे ढीगभर नि लोळून लोळून
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून...()

वडाचे झाड आणि बसायला पार
थंडीमधे काढायची उन्हात धार
कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू
हसताना पहायचे येते का रडू ...()

बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं
नुसतीच सही करुन धाडायची पत्रं
क्षणांना यायची घुंगरांची लय
प्राणांना यायची कवीतेची सय...()

माणूस आहेस "गलत" पण लिहितोस "सही"
पावसात भिजलेली कवीतांची वही
पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस?
काय रे.... काही आठवतय का नाही?
शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही
हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही...()

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ
छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ...()

ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त
कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त
गरम होतात डोळे नि थरथरतो हात
सर्रकन निघते क्षणांची कात...()

उलटे नि सुलटे कोसळते काही
मुक्यानेच म्हणतो "नको... आता नाही"
फार नाही... चालतो मिनिटे अवघी तीन
तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण
तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण
डोळे झाले जुने तरी पाणी नविन...(१०)

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन....


-- संदिप खरे

Wednesday, July 02, 2008

संपलो नाही कधीच


संपलो नाही कधीच मी पुरून उरलो होतो
विझलो नाही पुन्हां मी विझुन पेटलो होतो

तुझ्या श्वासाने झालो मी पुन्हां निखारा
त्या राखेत कोळसा मी बनुन पडलो होतो.

तुला वाटले माझी राख झाली ती कधीची
धुरावाटे त्या आभाळास मी भिडलो होतो

कोसळला नाहि तो पहीला पाऊस तेव्हां
पावसाआधी ढगातुन त्यावेळी मी बरसलो होतो

स्वखुशीने तुही भिजलिस सरीत आसवाच्यां
तुझ्या खुशीसाठी मी डोळ्यात साठलो होतो

तुला जाण नाही आसवाच्या चवेची आजही
तो सागर नव्हता त्यात मी विरघळलो होतो.

गंध होता हवेत माझ्या अस्तित्वाचा नेहमी
श्वासावाटे तेव्हां तुझ्या मी काळजात शिरलो होतो.

तुला वाटले मी दुर गेलो आता भेट नाही
मनात डोकावल नाहीस मी मनात मुरलो होतो

जेव्हां ओघळलीस तु... डोळ्यावाटे मीही मुक्‍त झालो
इतके दिवस तुझ्या मी डोळ्यात उरलो होतो.

नेहमीच राहीन जिवंत असा तुझ्या आठवणीत
देह संपला तरी तुझ्या मी देहात साठलो होतो.

तु कणा कणात शोधलस मी क्षणा क्षणात होतो
अगं कुठेच गेलो नव्हतो मी तुझ्यात सरलो होतो.
कवि : अद्न्यात
स्त्रोत: इ-पत्र