नसतेस घरी तू जेव्हा
जेवणही मीच बनवितो,
पोळ्यांचे होती नकाशे,
भाजीही मी करपवितो.....
नसतेस घरी तू जेव्हा
सर्वत्रच होई पसारा,
धुळ मणामणांची साचे,
कपड्यांचा होई ढिगारा.....
नसतेस घरी तू जेव्हा
बिल लॉंड्रीचे हे येते,
वाणीही लावी तगादा,
पाकीट रिकामे होते....
नसतेस घरी तू जेव्हा
मम इमेज हरवुन जाते,
ऑफिसला जातो तेव्हा,
सर्वत्रच चेष्टा होते.....
नसतेस घरी तू जेव्हा
भांड्यांचा होतो ढीग्,
मी घासत म्हणतो, सारे
नशिबाचे असती भोग.....
नसतेस घरी तू जेव्हा
टी.व्ही.ही मजेत असतो,
नसतात मालिका रडक्या,
मी मला हवे ते बघतो......
नसतेस घरी तू जेव्हा
जग सुनेसुनेसे भासे,
ना ओरडणे ना चिडणे,
घर्-दार सुखावून जाते.....
नसतेस घरी तू जेव्हा
जीव हा पोरका होतो,
दरक्षणी तुझ्या असण्याचा
आभास बोलका होतो.....
मूल कविता : संदीप खरे
विडंबन : सुयोग कुलकर्णी
No comments:
Post a Comment