सुरवंटराव
एकदा आमच्या बागेमध्ये आले सुरवंटराव
इतके दिवस ऐकून होते त्यांचे फक्त नाव!
माझ्याकडे पाहून जरा मिशीमध्ये हसले
गेले कुठे.. म्हणता म्हणता पानावरती दिसले!
दुसऱ्या दिवशी वेलीवरची पाने झाली फस्त
खादाडखाऊ सुरवंटराव निजले होते सुस्त!
दिवसेंदिवस सुरवंटराव दाखवू लागले रंग
बदलत गेला रोज त्यांच्या जगण्याचा ढंग!
का बरं सुरवंटराव इतके झाले शिष्ट?
स्वतच्याच कोषामध्ये राहू लागले मस्त?<
याचे उत्तर एके दिवशी माझे मलाच मिळाले
सुरवंटरावांचे चक्क फुलपाखरू की हो झाले!!
1 comment:
Very nice
Post a Comment