जगण्याला माझ्या
अर्थ नवा आला होता
खुंटलेल्या त्या दिशांनी
सुर्य नवा पहिला होता......
कोमेजलेल्या त्या क्षणांचा
बहर असा पहिलाच होता
नकळत फुलले कमळ मनाचे
जणू नवा पल्लव फुटला होता
शुभ्र धूक्यात धुंदलेली
कोमलशी पहाट होती
सप्त सुराने रंगलेली
सांज सावली ही दाट होती
कातरलेल्या त्या क्षणाची
मी ही एक सावली होती
आसवात भिजलेल्या पापण्याची
गोष्ट ती निराळीच होती
खळखळत्या लाटे सारखी
मधुर अशी तुझी हाक होती
त्या हाकेला साद देणारी
ओढ मनाची पाक होती
स्वैर मनाने गुंतलेली
अशीच तुझी साथ होती
कवटाळुन अश्रूंना सजलेली
अशीच माझ्या जीवनाची बाग होती...
सांज सावली ही दाट होती
कातरलेल्या त्या क्षणाची
मी ही एक सावली होती
आसवात भिजलेल्या पापण्याची
गोष्ट ती निराळीच होती
खळखळत्या लाटे सारखी
मधुर अशी तुझी हाक होती
त्या हाकेला साद देणारी
ओढ मनाची पाक होती
स्वैर मनाने गुंतलेली
अशीच तुझी साथ होती
कवटाळुन अश्रूंना सजलेली
अशीच माझ्या जीवनाची बाग होती...
-- रेश्मा
No comments:
Post a Comment