आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, May 14, 2008

हळवं मन

"काय आवडत तुला माझ्यातल..........??"
तु सारख मला विचारतेस.....
मि काहिच बोलत नाहि
म्हणुन मनातल्या मनात हिरमुसतेस......

तुला रुसलेल बघुन मग
मी अजूनच तुला चिडवतो
आणि तुझ्या चहेय्राकडे बघुन
फ़क्त भुवया उडवतो...........

"तशी ठिक आहेस ग..........
पण सांगण्यासारखं नाहिय काहि
नकट नाक, चिमुकले डोळे
आणि रंगाचा तर पत्ताच नाहि.........."

"तरि आवड्तेस तु मला
काळजी करू नकोस,
आधिच छोट्या ओठांना
आणखिन दाबू नकोस......"

मनभर अस चिड्वून
मी तुझ्याकडे बघितल,
पाठ्मोय्रा तुला हात धरून
माझ्याकडे वळवलं........

नजरेला नजर भिडली फ़क्त
आणि हसू माझे ओसरले,
भावविभोर तुझ्या डोळ्यांतून
झरझर अश्रु ओघळले..........

वेडि आहेस का? म्हणतं
मी जवळ तुला घेतल,
तुझे डोळे पुसता पुसता
स्वत:लाहि आवरलं............

बोलायच बरच होत
पण शब्द्च फ़ूट्त नव्ह्ते
मला बिलगलेली तू
माझे काळिज भिजत होते....

पण आज खर सांगू......
तू सर्वाथाने जिंकलयस मला
लाडके......... तुझं हळवं मन
तुझा गुलाम करतं मला..................

लाडके......... तुझं हळवं मन
तुझा गुलाम करतं मला.........
कवी : अद्न्यात

No comments: