===================================
स्वत:ला सदैव रडवुन दुस-याला नेहमी हसवायचं असतं
आपल्या ईच्छा मनात ठेवुन दुस-याचं कौतुक करायचं असतं
मनातलं चेह-यावर कधी आनायचं नसतं
कारण असं करुनच दुस-याचं मन फुलवायचं असतं
दुस-यांसाठी राब राब राबायचं असतं
आणि स्वत:च्या जीवाचं मात्र राण करायचं असतं
एवढं करुनही आपल्याला कुनी समजुन घेत नसतं
कारण सर्वांनाच आपापलं वार्थ साधायचं असतं
आपल्या ईच्छेचा खुन करायला कुणीही तयार असतं
आणि आपलं मन मात्र दुस-यांसाठी सदैव तयार असतं
पन दुस-याचं भलं करुनही नेहमी आपलचं चुकीचं दिसतं
आनि दुस-याचं मनं आपल्याला पाहुन खुदक हसतं
पन एकांतात आपलं मन किती रडतं असतं
कारण एकांत नसतांना ते सर्वांसाठीच हसतं
आणि म्हणुनच हे सर्व जनसमुहाला माहीत असतं
की दिसतं तसं नसतं म्हणुन जग फ़सतं
No comments:
Post a Comment