आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, March 14, 2008

प्रतिक्षा म्हणजे अक्षरशः झेलणं,
सोप नाही हे शिवधनुष्य पेलणं..

प्रतिक्षा म्हणजे अक्षरशः गोठणं
किर्र मध्यरात्रीला मेघाच साठणं

प्रतिक्षा म्हणजे कोरडा विजनवास
गुन्हा नसताही सक्तीचा कारावास

प्रतिक्षा म्हणजे निसटलेलं पाऊल
प्रत्येक हालचालीत तिची चाहूल

प्रतिक्षा म्हणजे चिंतेची काजळी
प्रियेचं आगमन अन् चेहरा उजळी

प्रतिक्षा म्हणजे दिर्घकाळ संन्यास
त्यानंतर येऊ घातलेला ऊपन्यास

प्रतिक्षा म्हणजे कंटाळवाणा त्रास
खरं तर ती येणाऱ्या सुगीचा वास

कवि: भूपेश
स्त्रोत: ई-पत्र

No comments: