आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, March 24, 2008

आम्ही प्रेम करणारच, चोचीत चोच पडणारच
काहीही म्हणूदेत दुनिया सारी, आम्ही नव्याने लढणारच

लैला-मजनू, हीर-रांझा नव्या नव्याने पैदा होणार
कॉलेज कॅम्पस, चौपाटी, कट्टे सारे नव्या जोड्यांनी फुलणार
पुन्हा नव्याने येणार श्रावण, सारे नव्याने भिजणारच
गळ्यात गळे पडणारच, आम्ही प्रेम करणारच

झेड ब्रिज, दुर्गा टेकडी मिळेल तिकडे जात रहाणार
एकाच कपात चहा घोटणार, हातामध्ये हात पडणार
पोलीस मामा आलाच भिडायला, त्यालासुध्दा भिडणारच
ह्या वयात भुलणारच, आम्ही प्रेम करणारच

बाईकमागे खेटुन बसता, आमचा तोल सुटत जाणार
चौक असो, सिग्नल असो.. सारं काही तुटत जाणार
खड्डे येवोत, नको येवोत, मध्येच ब्रेक लागणारच
रुसवे-फुगवे घडणारच, आम्ही प्रेम करणारच

काहीही म्हणूदेत दुनिया सारी, आम्ही नव्याने लढणारच
चोचीत चोच पडणारच, आम्ही प्रेम करणारच

कवी: संतोष (कवितेतला)

No comments: