उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये..
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ धृ ॥
नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार..
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ १ ॥
असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे..
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ २ ॥
शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये गर्दी फार..
असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ३ ॥
कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव..
वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ४ ॥
आधी उत्सुक्तांचा जीव, त्याला बांधून घ्यावी शीव..
घर दार उबवत रहावे फक्त, डबके सोडून हिंडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ५ ॥
स्वतःलाच घालत धाक, कुरकूर रेटत ठवलं चाक..
खेचत ठेवले अजून गाडे, आता फार ओढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ६ ॥
कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ..
तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ७ ॥
-- संदीप खरे.
स्त्रोत : ई पत्र

No comments:
Post a Comment