डॉक्टर विक्रमराव चक्रम यांच्या दवाखान्यात शिरीष आणि मुग्धा हे नवपरिणीत जोडपं गेलं ते मुग्धाला दिवस गेले आहेत, याची खात्री करण्यासाठी. आइनस्टाइनसारखे केस पिंजारलेल्या, चेहऱ्यावर वेडसर छटा असलेल्या डॉक्टरांनी तपासण्या करून मुग्धाच्या गरोदर असण्यावर शिक्कामोर्तब केलं आणि मग तिच्या पोटावर खरोखरचं शिक्कामोर्तब केलं... म्हणजे चक्क एक शिक्काच मारला तिच्या पोटावर आणि लगेच पुढच्या पेशंटला बोलावून यांना रफादफा करून टाकलं.
चक्रावलेल्या शिरीषने घरी आल्यावर मोठं भिंग घेऊन मुग्धाच्या पोटावरचा मजकूर वाचला. तिथे लिहिलं होतं, ''हा मजकूर सूक्ष्मदर्शकाशिवाय वाचता येऊ लागला की पुढच्या चेकअपसाठी दवाखान्यात या!!!!''
आता प्रेमाचा उमाळा येऊन एकांतात तुम्ही छोकरीला सांगता की ती फार सुंदर दिसतेय...
...
... आणि नंतर काय करता?
लाइट घालवता!!!!
चक्रावलेल्या शिरीषने घरी आल्यावर मोठं भिंग घेऊन मुग्धाच्या पोटावरचा मजकूर वाचला. तिथे लिहिलं होतं, ''हा मजकूर सूक्ष्मदर्शकाशिवाय वाचता येऊ लागला की पुढच्या चेकअपसाठी दवाखान्यात या!!!!''
*****
प्रेम वगैरे फार गोंधळाचा प्रकार असतो हो.हॉटेलच्या रिसेप्शन डेस्कवरचा फोन वाजला, ''हॅलो, ताबडतोब नवव्या मजल्यावर या. माझी बायको खिडकीतून उडी मारून आत्महत्या करायचा प्रयत्न करतेय...''
'' साहेब, त्यात आम्ही काय करणार?'' डेस्कवरचा खडूस क्लार्क खेकसला.
'' काय करणार म्हणजे! अहो, त्या खिडकीचं दार घट्ट बसलंय... उघडत नाहीये खिडकी!!!!''
'' साहेब, त्यात आम्ही काय करणार?'' डेस्कवरचा खडूस क्लार्क खेकसला.
'' काय करणार म्हणजे! अहो, त्या खिडकीचं दार घट्ट बसलंय... उघडत नाहीये खिडकी!!!!''
*****
आता प्रेमाचा उमाळा येऊन एकांतात तुम्ही छोकरीला सांगता की ती फार सुंदर दिसतेय...
...
... आणि नंतर काय करता?
लाइट घालवता!!!!
*****
No comments:
Post a Comment