दोघी
.
मला ती रोज सकाळी,
नऊ-सहाच्या लोकलला दिसायची.
नाजूक कोवळी नीटस सावळी.
गळ्यात काळी पोत बांधलेली.
हातामध्ये दुकान घेऊन फिरणारी.
पिना, रबर, टिकल्या, कानांतली
सगळं कसं रंगीबेरंगी.
ही एवढी ओझी लीलया वागवायची.
पाठीवरती आणखीन एक झोळी,
बाहेरुन गोल मुटकुळ्यासारखी दिसणारी.
कधीतरी त्यात हालचाल जाणवायची.
तिचा बाळ झोपायचा एवढ्या आवाजातही!!
मी तिला निरखत रहायचे नेहमी.
तिचं बोलण, तिच्या चपळ हालचाली,
गिर्हाइकाशी बोलतानाची मधाळ आर्जवी वाणी.
आणि सखी बरोबर अगम्य खिटपीट करणारी.
..............
तिला मी दिसायचे समोर.
दारात उभी रहाणारी
एका खांद्याला पर्स, दुसर्या हातात पिशवी,
हातात पेपर किंवा मासिकाची घडी धरलेली.
गर्दीत मिळालेला एकांत जगू पहाणारी.
तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजायची
मग फोन काढून बोलणारी मी,
ऑफिसमध्ये पोहचण्याआधीच कामे सुरू व्हायची.
एकमेकींना निरखताना कधीतरी
दोघींची नजरानजर झाली
अन एकमेकींकडे पाहून
ओळखीचं हसलो दोघी.
-- स्वाती फडणीस
.
मला ती रोज सकाळी,
नऊ-सहाच्या लोकलला दिसायची.
नाजूक कोवळी नीटस सावळी.
गळ्यात काळी पोत बांधलेली.
हातामध्ये दुकान घेऊन फिरणारी.
पिना, रबर, टिकल्या, कानांतली
सगळं कसं रंगीबेरंगी.
ही एवढी ओझी लीलया वागवायची.
पाठीवरती आणखीन एक झोळी,
बाहेरुन गोल मुटकुळ्यासारखी दिसणारी.
कधीतरी त्यात हालचाल जाणवायची.
तिचा बाळ झोपायचा एवढ्या आवाजातही!!
मी तिला निरखत रहायचे नेहमी.
तिचं बोलण, तिच्या चपळ हालचाली,
गिर्हाइकाशी बोलतानाची मधाळ आर्जवी वाणी.
आणि सखी बरोबर अगम्य खिटपीट करणारी.
..............
तिला मी दिसायचे समोर.
दारात उभी रहाणारी
एका खांद्याला पर्स, दुसर्या हातात पिशवी,
हातात पेपर किंवा मासिकाची घडी धरलेली.
गर्दीत मिळालेला एकांत जगू पहाणारी.
तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजायची
मग फोन काढून बोलणारी मी,
ऑफिसमध्ये पोहचण्याआधीच कामे सुरू व्हायची.
एकमेकींना निरखताना कधीतरी
दोघींची नजरानजर झाली
अन एकमेकींकडे पाहून
ओळखीचं हसलो दोघी.
-- स्वाती फडणीस
1 comment:
sundar. khup chan. keep it up.
Post a Comment