खूप जवळ वाटणारा तु... आज दूर भासलास....
रडले मी.... असा अनोळखी हसलास....
तुझी रे मी कोण???
कि उगा समांतर रेषेशी सांधते कोन.....
माझ्यातल्या वादळाला .....तुच एक घर....
भिजते तुझ्यातच माझी.... वेडी सर....
तुझ्या ओंजळीत चेहरा लपवायचा आहे....
अश्रूंना तोच एक मार्ग मोकळा आहे...
टिपू नकोस भिजबिंदू निदान....
वाहू दिले असतेस.... फक्त बेभान...
तेव्हढेच मागणे आज आहे...
जगणे माझे त्या क्षणासाठीच बहुधा आहे...
भेटशील.... न भेटशील.... निदान स्वप्नात तरी ये...
क्षितिजाच्या पल्याड राहून नुसता आश्वास दे...
बघ... नाहीतर तुलाही येईल आठवण माझी....
साद घालशील तेव्हा....पण...पण...
परतून मी येणार नाही....
परतून मी येणार नाही.....
------ चैताली.
No comments:
Post a Comment