आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, January 18, 2008

वहीचं पान फाडताना
कोणताच विचार केला नव्हता
नंतर कळलं उरलेल्या पानांचा
एक आधार गेला होता
- अद्न्यात

झाडाच्या ओल्या जख्मां
कुणालाही कळत नाही
म्हणून सरणावर
ओली लाकडं जळत नाही
- गोवर्धन भोसले

प्रेम म्हणजे काय रे
दुधावरची साय रे
आपुलकीची उब मिळता
सहज उतू जाय रे
- प्रसाद कुलकर्णी

जगण्याचे बळ देते
रोज तुझे हास्य मला
तुझ्या एका हास्यास्तव
लाख चुका माफ तुला
- प्रसाद कुलकर्णी

आहे माझ्याकडे शक्ती
सर्व काही सोसायला
तरीही वाटतं हवं होतं
कुणीतरी डोळे पुसायला
- अद्न्यात

शेजारच्या गावी तमाशा आहे
पाय ठेवायला जागा नाही
आपल्या गावी किर्तन आहे
ऐकायला एकही जागा नाही
- काशिनाथ भारंबे

आयुष्य देतानाच तो त्यातनं
सुख वजा करून घेतो
नंतर सुखाच आमिष दाखवून
स्वतःची पुजा करून घेतो
- प्रसाद कुलकर्णी

मला लुटण्याचे
लाखो प्रकार झाले
ते चोर आज
सावकार झाले
- गोवर्धन भोसले

तू फुलांची बरसात केलीस
नेमकी परक्याच्या झोळीत
मी मात्र बहराला मुकले
जीवनाच्या या पानझडीत
- आकाशानंद

रेड्यानं वेद गायले
म्हणून ज्ञानेश्वराला इथे पुजतात
ज्ञानेश्वरीपेक्षा
इथे चमत्कारच रुजतात
- चंद्रशेखर गोखले

तक्रार ही नाही की
चंद्र आत डोकावतो
पण त्याचं बघून चोंबडा
प्राजक्तही सोकावतो
- चंद्रशेखर गोखले

1 comment:

cvrkut said...

Lijepe pjesmice koje doduše neznam pročitati.Pozdrav iz Croatia!

http://www.cvrkut.bloger.hr