सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे
तो कविंचा मान तितुकी पायरी माझी नव्हे
आम्ही अरे साध्याच अपुल्या जीवना सम्मानितो
सम्मानितो हासू तसे या आसवा सम्मानितो
जाणीतो अंती आम्हाला मातीच आहे व्हायचे
नाहीतरी दुनियेत दुसरे काय असते व्हायचे?
मानतो देवास ना मानतो ऐसे नव्हे
मानतो इतुकेच की तो आमुचा कोणी नव्हे
आहो असे बेधूद अमुची धुंद ही साधी नव्हे
मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी, आम्ही नव्हे......
-- भाऊसाहेब पाटनकर
तो कविंचा मान तितुकी पायरी माझी नव्हे
आम्ही अरे साध्याच अपुल्या जीवना सम्मानितो
सम्मानितो हासू तसे या आसवा सम्मानितो
जाणीतो अंती आम्हाला मातीच आहे व्हायचे
नाहीतरी दुनियेत दुसरे काय असते व्हायचे?
मानतो देवास ना मानतो ऐसे नव्हे
मानतो इतुकेच की तो आमुचा कोणी नव्हे
आहो असे बेधूद अमुची धुंद ही साधी नव्हे
मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी, आम्ही नव्हे......
-- भाऊसाहेब पाटनकर
No comments:
Post a Comment