प्रवासात हे असे डोंगराएवढे उंच, आकाशाइतके विशाल, वृक्षांसारके सावली देणारे,
खळखळाट करीत झेपावणारे प्रपात पाहिले म्हणजे मला पैसा-प्रतिष्टा, पद ह्यामागे
धावणारा माणूस फ़ार केविलवाणा वाटतो। -- व. पु. काळे
श्वास म्हणजे विश्वाशी सोयरीक। म्हणूनच अत्यंत जिवाभावाची व्यक्ती गेली तर 'मी एक क्षण जगणार नाही' असं अनेक म्हणतात आणि मागे खुप वर्षे राहतात. त्यांच प्रेम खोटं नसतं, पण विश्वाशी सोयरीक तुटलेली नाही हे त्यांना माहीत नसतं.-- व. पु. काळे
दु:खं, आनंद, जय, पराजय, हसु, आसु, जन्म, मरण, विरह-मिलन, सगळं तसच असतं .प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेतं, एवढच काय ते नविन. पुन्हा जन्म घेण्याची ही क्रिया थांबणं हेच मरण.-- व. पु. काळे
जीवनाचा साथीदार म्हणुन 'क्ष' व्यक्तिला पसंत करायचं, त्या व्यकितबरोबर आयुष्य घालवायचं, त्याला शरिर अर्पण करायचं, पण मनाची कवाडं उघडी करायला मात्र तिथं वाव नसावा.हीच माणसांची केवढी मोठी शोकांतिका? ह्याला संसार म्हणायचं.
No comments:
Post a Comment